वीर सावरकर मार्गावरील बाळ ठाकरे स्मारकाचा (Bal Thackeray Memorial) पहिला टप्पा जानेवारी 2025 च्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी पक्षात फूट पाडल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमात एकत्र दिसणार आहेत.
राज्य सरकार हे स्मारक बांधत असल्याकारणाने या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) या दोघांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. ट्रस्टचे नेते असल्याने उद्धव ठाकरेही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
मुंबई (mumbai) महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (mmrda) हे स्मारक दोन टप्प्यात बांधणार आहे. MMRDA ला मार्च 2021 मध्ये या प्रकल्पासाठी मंजुरी मिळाली होती, ज्यासाठी 400 कोटी खर्च अपेक्षित होता.
त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी 250 कोटी रुपये आणि दुसऱ्या टप्प्यावर 150 कोटी रुपये खर्च केले जातील. 2012 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर स्मारक बांधण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी, या स्मारकासाठी 89 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता.
पहिल्या टप्प्यासाठी आतापर्यंत 229.74 कोटी रुपये खर्च आला आहे. तसेच या स्मारकाचे 99 टक्के काम अद्याप पूर्ण झाले आहे. या टप्प्याचे एकूण क्षेत्रफळ 6,056.82 चौरस मीटर आहे.
पहिला टप्पा महिनाभरात पूर्ण होईल, असे एमएमआरडीएच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे नागपुरात हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरला सुरू होणार असून 21 डिसेंबरला संपणार आहे. या स्मारकाचे लोकार्पण आणि उद्घाटन याविषयीचा निर्णय या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनानंतरच घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Tata Projects ला मार्च 2021 मध्ये प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू करण्यासाठी वर्क ऑर्डर देण्यात आली होती. ज्यामध्ये लँडस्केपिंग, ॲडमिनिस्ट्रेशन ब्लॉक बांधणे, एंट्री ब्लॉक, इंटरप्रिटेशन सेंटर आणि महापौरांचे निवासस्थान पुनर्संचयित करणे इ. समाविष्ट होते. पहिल्या टप्प्यातील प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संरक्षक आभा नरेन लांबा आहेत.
602.39 स्क्वेअर मीटर क्षेत्रफळ असलेल्या या हेरिटेज वास्तूमध्ये ठाकरे कुटुंबाचा इतिहासाबद्दल माहिती दर्शवण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त सेनाप्रमुखांचे दैनिक सामना तसेच इतर प्रकाशनांसाठी काढलेली व्यंगचित्रे आणि जून 1966 पासून शिवसेनेच्या स्थापनेपासून झालेल्या विकासाची माहिती दाखवण्यात येणार आहे.
प्रशासकीय ब्लॉकमध्ये दोन हॉल, दोन बैठक कक्ष, एक सुरक्षा कक्ष आणि 27 पार्किंग जागा असतील. इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये एक गॅलरी, एक पुस्तक वाचनालय, डिजिटल संसाधने आणि सार्वजनिक शौचालये असतील.
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे कार्यालय, कॉन्फरन्स रूम, कॅन्टीन आणि सार्वजनिक सुविधा या सर्व प्रशासकीय ब्लॉकमध्ये असतील.
लेझर शो, साइनेज, ब्रँडिंग, डिजिटल मॅपिंग यासारखे ऑडिओ व्हिज्युअल घटक प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील भाग आहेत. प्रकल्पाचा पहिला टप्पा मूळत: मार्च 2023 मध्ये पूर्ण होणार होता, परंतु नंतर तो ऑगस्ट 2023 आणि नंतर मार्च 2024 पर्यंत लांबणीवर गेला आहे.
हेही वाचा