Advertisement

सीएसएमटी स्टेशनवर धावणार बॅटरी कार


सीएसएमटी स्टेशनवर धावणार बॅटरी कार
SHARES

सीएसएमटी स्टेशनवर अपंग आणि वयोवृद्धांसाठी बॅटरी ऑपरेटेड कारची सुविधा सुरू करण्यात आली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ४ वर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या कारमध्ये बसण्यासाठी प्रवाशांना ४൦ रुपये मोजावे लागणार आहेत.


प्रवाशांच्या सोयीसाठी

वृद्ध आणि अपंग प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेस्थानकावर बॅटरी कारची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या कारने दिव्यांग आणि वृद्ध प्रवासी आपल्या सामानासह एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाऊ शकतील.

अनेकदा मेल एक्स्प्रेसमधून उतरलं की सामानासाठी कुलीला बोलवावं लागतं. शिवाय कुली जास्त पैसे घेतात. त्यावेळी या अशा बॅटरी कारचा उपयोग होऊ शकेल. सीएसएमटी स्थानकांत २ बीओसी म्हणजे बॅटरी ऑपरेटेड कार आणण्यात आल्या आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा