Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

मुंबईचे डब्बेवाले देणार 10 रुपयात थाळी

महाराष्ट्रात शिवसेनेकडून या आश्वासनाबाबत कोणतिही पाऊले शिवसेना उचलत नसताना, दुसरीकडे मुंबईचे डबेवाले लवकरच ही योजना सुरु करणार आहेत.

मुंबईचे डब्बेवाले देणार 10 रुपयात थाळी
SHARES

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2019 मध्ये शिवसेनेच्या वचननाम्यातील 10 रुपये थाळी देण्याचे आश्वासन आता मुंबईचे डबेवाले पूर्ण करणार आहेत. शिवसेनेच्या वचननाम्यातील या 10 रुपये थाळीच्या वचनाची चर्चा सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात होती. या आश्वासनाबाबत काही प्रमाणात टीकाही झाली होती.  महाराष्ट्रात शिवसेनेकडून या आश्वासनाबाबत कोणतिही पाऊले शिवसेना उचलत नसताना,  दुसरीकडे मुंबईचे डबेवाले लवकरच ही योजना सुरु करणार आहेत. म्हणजेच मुंबईचे डबेवाले 10 रुपयांमध्ये थाळी उपलब्ध करून देणार आहेत.

मुंबई डबेवाला असोशिएशनने याबाबत पुढाकार घेतला असून, अन्नवाटपासाठी विक्रोळी हे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. विक्रोळीच्या टागोरनगर येथे दुपारी 12 ते 2 तर रात्री 7 ते 9 या वेळेत ही 10 रुपयांमधील थाळी उपलब्ध केली जाणार आहे. डॉ. पवन अग्रवाल हे मुंबईच्या डबेवाल्यांवर पीएचडी करत आहेत, त्यांनी आपली जागा या योजनेसाठी दिली आहे. याबाबत बोलताना डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर म्हणाले, ‘काहीही करू, वेळप्रसंगी तोटा सहन करू मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 10 रुपयांत थाळी ही योजना यशस्वी करून दाखवू.’

दरम्यान, याआधी अंबरऩाथ आणि  ठाण्यतील खारटन रोड येथे काही तरुणांनी पुढाकार घेऊन 10 रुपयांत भात व भाजी देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. मात्र हजारोमुंबई करांना दररोज वेळेत डब्बा पोहचवणाऱ्या डब्बेवाल्यांनी आता डब्बे पोहचवण्यासोबत मुंबईकरांना 10 रुपयात सकस आहार देणार आहेत. सध्या विक्रोळी येथील जागेत काही बदल केले जात आहेत, ते पुनर झाल्यावर येत्या 15 दिवसांत ही योजना सुरु केली जाईल.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा