Advertisement

बेस्ट बस चालकाचं नियंत्रण सुटलं, अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू

भांडुप पश्चिमेकडील अशोक केदार चौकात हा अपघात झाला. ६०५ क्रमांकाची ही बस भांडुप रेल्वे स्थानकावरून टेंभीपाडा परिसराकडे जात होती.

बेस्ट बस चालकाचं नियंत्रण सुटलं, अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू
SHARES

भांडूप गाढव नाका परिसरामध्ये बेस्ट चालकाचं बसवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. 

भांडुप पश्चिमेकडील अशोक केदार चौकात हा अपघात झाला. ६०५ क्रमांकाची ही बस भांडुप रेल्वे स्थानकावरून टेंभीपाडा परिसराकडे जात होती. भांडुपचा गाढव नाका परिसरामध्ये भरधाव वेगात असताना बेस्ट चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. बस चालकाचं नियंत्रण सुटून ही बस समोरून येणाऱ्या एका रिक्षाला धडकली. रिक्षाला चुकवण्याच्या प्रयत्नात बस नंतर एका चाळीच्या विजेच्या मीटर केबिनला धडकली. त्यात तिघे जखमी झाले. या घटनेत ८२ वर्षाचे कुंडलिक भगत यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात रविंद्र तिवारी (वय ६५) व मुकेश उपाध्याय (वय ४४) हे दोघे जखमी झाले आहेत. या दोघांवरही उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. या घटनेनंतर भांडूप पोलिसांनी बेस्ट चालकाला ताब्यात घेतले असून मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास भांडुप पोलिस करत आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा