Advertisement

निवडणुकांमुळे बेस्टच्या बस सेवेवर परिणाम

विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत सुमारे 657 बसेस सामाविष्ट केल्या जाणार आहेत. ज्यामुळे शहरातील नियमित बससेवेच्या फेऱ्यांवर लक्षणीय परिणाम होणार आहे.

निवडणुकांमुळे बेस्टच्या बस सेवेवर परिणाम
SHARES

बेस्टने (BEST) घोषित केले आहे की, 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी त्यांच्या ताफ्यातील 20 टक्क्यांहून अधिक कर्मचारी निवडणूक कर्तव्यांसाठी तैनात केले जातील. परिणामी दोन्ही दिवस बस सेवांमध्ये लक्षणीय घट होणार आहे.

बेस्टच्या ताफ्यात अंदाजे 3,000 बस आहेत. बेस्ट सुमारे 35 लाख प्रवाशांच्या दैनंदिन वाहतुकीच्या गरजा पूर्ण करते. तथापि, घोषणेनुसार, विधानसभा निवडणुकीच्या (vidhan sabha elections) प्रक्रियेत सुमारे 657 बसेस सामाविष्ट केल्या जाणार आहेत. ज्यामुळे शहरातील नियमित बससेवेच्या फेऱ्यांवर लक्षणीय परिणाम होणार आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर पोस्ट केलेल्या निवेदनात, बेस्टने मुंबईकरांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी बसेससाठी उशीर होणार आहे. तसेच प्रवाशांना बससाठी जास्तीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना पर्यायी प्रवासाचे पर्याय शोधण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच निवडणुकीच्या काळात गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांना पर्यायी वाहनांचा वापर करण्यासाठी सांगितले जात आहे. 

निवडणुकीशी संबंधित कामांना प्राधान्य देऊन अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे आश्वासनही बेस्टने दिले आहे.


हेही वाचा

मतदान केंद्रावर मोबाईल सोबत नेण्यास बंदी

मुंबई, ठाणे ते नवी मुंबई विमानतळापर्यंत वॉटर टॅक्सी सुरू होणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा