Advertisement

आता ‘मीबेस्ट’ अॅपद्वारे भरा वीजेचं बिल

बेस्ट प्रशासनाने आपलं अ‍ॅप सुरू केलं असून, याद्वारे वीज बिल भरता येणार आहे. बेस्टने ‘मीबेस्ट’ हे मोबाइल अ‍ॅप विकसीत केलं आहे. या अॅपद्वारे वीज बील भरल्यास ग्राहकांना सूट देखील मिळणार आहे. त्यामुळे वीज बील भरणा केंद्रावर लांब रांगेत उभं राहून वीज भरण्याऱ्या ग्राहकांचा त्रास आता कमी होणार आहे.

आता ‘मीबेस्ट’ अॅपद्वारे भरा वीजेचं बिल
SHARES

वीज बिल भरणा केंद्रावर लांबलचक रांगा लावून वीज भरण्यांसाठी खूशखबर आहे. आता बेस्ट प्रशासनाने आपलं अ‍ॅप सुरू केलं असून, याद्वारे वीज बिल भरता येणार आहे. बेस्टने ‘मीबेस्ट’ हे मोबाइल अ‍ॅप विकसीत केलं आहे. या अॅपद्वारे वीज बील भरल्यास ग्राहकांना सूट देखील मिळणार आहे. त्यामुळे वीज बील भरणा केंद्रावर लांब रांगेत उभं राहून वीज भरण्याऱ्या ग्राहकांचा त्रास आता कमी होणार आहे.


कसा होईल फायदा?

बेस्ट प्रशासनानं विकसित केलेल्या ‘मीबेस्ट’ या मोबाइल अ‍ॅपमध्ये ग्राहकांना आपलं वीज बिल पाहता येणार आहे. मोबाईच्या माध्यमातून देखील ग्राहकांना वीज बिल पाहता येणार असून भरताही येणार अाहे. क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून वीज बिलाचा भरणा ग्राहकांना अॅपमधून करता येणार आहे. याशिवाय ग्राहकांनी वेळेत वीज बिल भरल्यास एकूण रकमेत १.२५ टक्के सूट मिळणार आहे.


वीजसेवांबाबत करात येईल तक्रार 

‘मीबेस्ट’ अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना वीजसेवांबाबत तक्रार आणि सूचना नोंदवता येणार आहेत. तक्रार नोंदवण्याकरता ग्राहकांना त्यांच्या वीज बिलावरील ग्राहक क्रमांकाची नोंदणी करणं बंधनकारक असणार आहे. या तक्रारीची पोचही ग्राहकांना देण्यात येणार असून, याबाबत ग्राहकांना एसएमएस देखील पाठवला जाणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा