Advertisement

सलग पाचव्या दिवशीही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरुच


सलग पाचव्या दिवशीही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरुच
SHARES

बेस्ट कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून पुकारलेल्या संपाचा शनिवारी पाचवा दिवस आहे. मागण्यांवर कोणताही तोडगा निघत नसल्यामुळं कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. मात्र या संपाचा नाहक त्रास लाखो मुंबईकरांना सहन करावा लागतं आहे. मागील चार दिवसांपासून या संपाबाबत चर्चा आणि बैठका सुरू आहेत. या बैठकांमध्ये देखील कोणताही तोडगा निघत नसल्यामुळं कर्मचाऱ्यांनी संपावर कायम राहण्याची भूमिका घेतली  आहे.


फोल ठरली

शुक्रवारी सकाळपासून सुरू असलेल्या बैठका, मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेली याचिका, महापौर दालनातील चर्चा आदींमुळे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना न्याय मिळण्याची आशा होती. मात्र तोडगा निघण्याची शक्यता अखेरीस फोल ठरली. त्यामुळे सायंकाळी उशिरा परळमध्ये झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात संप मागे न घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. 


उच्चस्तरीय बैठक फोल

मागील चार दिवसांपासून बेस्टचे तब्बल ३० हजार कर्मचारी संपात उतरले आहेत. हा संप वाढू नये यासाठी उच्च न्यायालयानं लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार शनिवारी सकाळी उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली होती. यासाठी राज्य सरकारनं त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीमध्ये मुख्य सचिव, परिवहन विभागाचे आयुक्त आणि नगरविकास खात्याच्या सचिवांचा समावेश होता. पण या बैठकीत देखील काही तोडगा निघाला नाही.



माघार नाही

संपावर तोडगा निघत नसल्याने शुक्रवारी संध्याकाळी परळ येथील शिरोडकर सभागृहात कामगार मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात कर्मचाऱ्यांनी 'कोणत्याही स्थितीत माघार घेणार नाही मागण्या पुर्ण होत नाही तो पर्यंत संप सुरूच राहणार', अशी घोषणाबाजी एकजूटीनं केली. त्यामुळं तोडगा निघाला नाही तर संप सूरूच राहणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.  


इतर कामगारांचा सहभाग

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्यामुळं महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी शनिवारपासून पाठिंबा दर्शविला आहे. त्याचप्रमाणं, अखिल भारतीय बंदर आणि गोदी कामगार संघटनेनं देखील संपाला पाठिंबा दिला आहे.


स्कूल बस उतरवल्या

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळं मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. घरी, कामवार, इतर ठिकाणी जाण्यासाठी खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. तसंच, नेहमीच्या भाड्यापेक्षा अधिक भाडे मोजावे लागत आहे. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी स्कूल बस संघटनेनं पुढाकार घेतला आहे. या संघटनेने तब्बल १००० स्कूल बस मुंबईकरांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरवल्या आहेत. या बसमधून प्रवास करताना १० किलोमीटरपर्यंत २० रुपये भाडे आकारले जाणार आहे. त्यानंतर पुढील अंतरासाठी बेस्ट बसप्रमाणं भाडं आकारले जाणार आहे.




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा