Advertisement

भगतसिंग नगर, लक्ष्मी नगरमधील प्रकल्पग्रस्तांना मिळणार सदनिका

मुंबईतील भगतसिंग नगर नं. २ व लक्ष्मी नगर, गोरेगाव (पश्चिम) येथील पात्र प्रकल्पग्रस्तांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेला मिळालेल्या सदनिकांमधून उपलब्धतेनुसार सदनिका देण्यात येईल.

भगतसिंग नगर, लक्ष्मी नगरमधील प्रकल्पग्रस्तांना मिळणार सदनिका
SHARES

मुंबईतील भगतसिंग नगर नं. २ व लक्ष्मी नगर, गोरेगाव (पश्चिम) येथील पात्र  प्रकल्पग्रस्तांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेला मिळालेल्या सदनिकांमधून उपलब्धतेनुसार सदनिका देणार असल्याची माहिती, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील (satej patil) यांनी दिली.

राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. या बैठकीत नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पी /दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त धोंडे तसंच सामाजिक कार्यकर्त्या माधवी राणे सहभागी झाले होते.

हेही वाचा- महापालिका 'यांच्या'साठी खरेदी करणार २४ नव्या गाड्या

बृहन्मुंबई महानगरपालिकेला (bmc) गोरेगाव, मालाड विभागात डीपी रोड पोईसर नाला रुंदीकरण इत्यादी विविध प्रकल्पांसाठी मागील २ वर्षात एकूण ८०६ प्रकल्पग्रस्त सदनिका झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून उपलब्ध झाल्या आहेत. या सदनिकापैकी अद्यापपर्यंत वाटप न झालेल्या सदनिकांचे उपलब्धतेनुसार वाटप प्राधान्याने भगतसिंग नगर नं. २ व लक्ष्मी नगर, गोरेगाव (पश्चिम) येथील पात्र  प्रकल्पग्रस्तांना करण्यात यावं, असे निर्देश राज्यमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी दिले.

महानगरपालिकेला मिळालेल्या सदनिका उपलब्धतेनुसार पात्र प्रकल्पग्रस्तांना देण्याबाबत कार्यवाही करावी असे निर्देश यावेळी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.

(bhagat singh and laxmi nagar project affected people in goregaon will get home by bmc)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा