भांडुपमधील पोलीस चौकीचे नूतनीकरण

 Bhandup
भांडुपमधील पोलीस चौकीचे नूतनीकरण
Bhandup, Mumbai  -  

शहरात ठिकठिकाणी रंग उडालेल्या, तडा गेलेल्या पोलीस चौक्यांच्या भिंती, तेथील कोंदट वातावरण, पायाभूत सुविधांची कमतरता अशा एक ना अनेक गैरसोयींचा सामना करत पोलीस कर्मचारी बारा-बारा तासांहूनही अधिक काळ कर्तव्य बजावत असतात. पोलीस कर्मचाऱ्यांनाही उत्साही वातावरणात काम करता यावे, या उद्देशाने 'सावली फाऊंडेशन' समाजिक संस्थेने भांडुप पोलीस ठाण्याच्या बीट क्र.1 पोलीस चौकीचे नूतनीकरण करून दिले आहे.

सामाजिक बांधिलकी जपत 'सावली फाऊंडेशन'ने भांडुप येथील पोलीस चौकीचे नूतनीकरण केले आहे. भांडुप पोलीस ठाण्याच्या बीट क्र. १ पोलीस चौकीचा नूतनीकरण सोहळा नुकताच पार पडला. पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी या पोलीस चौकीचे उद्घाटन केले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त शशांक सांडभोर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे, सावली फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश जाधव आदी उपस्थित होते. चौकीच्या नूतनीकरणामुळे येथे कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading Comments