Advertisement

मुंबईच्या ‘भेळ क्वीन’चं निधन

मुंबईची भेळ क्वीन अशी ओळख निर्माण करणाऱ्या नीला मेहता यांचं नुकतंच निधन झालं. पेडर रोड इथं त्यांचं स्नॅक्स स्टोअर होतं.

मुंबईच्या ‘भेळ क्वीन’चं निधन
SHARES

मुंबईची भेळ क्वीन अशी ओळख निर्माण करणाऱ्या नीला मेहता यांचं नुकतंच निधन झालं. पेडर रोड इथं त्यांचं स्नॅक्स स्टोअर होतं. त्याद्वारे त्या मागील ४५ वर्षांपासून घरगुती ढोकला, खांडवी, भेळपुरी, शेवपुरी, समोसा आणि इतर गुजराती स्नॅक्स विक्रीचा व्यवसाय करायच्या.

नीला मेहता यांनी साधारणत: १९७४ साली घरगुती ढोकळा विकण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या दारोदारी जाऊन ढोकळा विकायच्या. त्यांनी घरी बनवलेले पदार्थ ग्राहक आवडीने खाऊ लागले. त्यानंतर हळुहळू त्यांनी इतर पदार्थांचाही त्यात समावेश केला.

त्यांच्या पदार्थांना मुंबईसहीत अहमदाबाद, कोलकाता, दिल्ली आणि जकार्तामध्येही मागणी होती. केंप्स कॉर्नर, कफ परेड आणि पेडर रोड इथं त्यांची दुकानं आहेत.  त्यांच्या निधनानंतर आता त्यांचे कुटुंब हा व्यवसाय सांभाळणार आहेत. 



हेही वाचा-

गल्लीबेल्ली : चविष्ट महाराष्ट्रीयन मेजवानी

'या' फेस्टिव्हलमध्ये खा मॅगी बिर्यानी, पिझ्झा आणि बरंच काही



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा