Advertisement

भेंडीबाजार इमारत दुर्घटना : मृतदेह मिळवण्यासाठी नातेवाईकांची धडपड


भेंडीबाजार इमारत दुर्घटना : मृतदेह मिळवण्यासाठी नातेवाईकांची धडपड
SHARES

मुंबईच्या जे.जे मार्ग परिसरातील हुसैनीवाला ही ५ मजली इमारत गुरुवारी पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला असून अनेक रहिवासी अजूनही बेपत्ता आहेत. एका बाजूला इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेली आपली व्यक्ती सुखरूप असावी, अशी त्यांच्या नातेवाईकांकडून प्रार्थना केली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आलेले मृतदेह मिळवण्यासाठी नातेवाईकांची धडपड सुरू आहे.

या दुर्घटनेत उत्तर प्रदेशातून मुंबईत कामासाठी आलेले काही तरुणही मृत्यूमूखी पडले आहेत. या तरूणांचे मृतदेह अजूनही त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिलेले नाहीत. हे मृतदेह मिळवण्यासाठी नातेवाईकांचे प्रयत्न सुरू असले, तरी जे. जे. रुग्णालय प्रशासनाकडून त्यांना अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.



आम्हाला आमच्या लोकांचे मृतदेह शक्य तितक्या लवकर द्यावेत आणि उत्तर प्रदेशमधील भगवानपूर या गावी मृतदेह नेण्यासाठी मदत करावी, अशी प्रतिक्रिया त्यांचे नातेवाईक उस्मान अली मन्सूरी यांनी दिली.

उस्मान अली मन्सूरी यांचा भाचा नसीर अली (२४) आणि पुतण्या कय्यूम (२५) या दोघांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. पण, अजूनही या दोघांचे मृतदेह त्यांना सुपूर्द करण्यात आलेले नाही. हे दोघेही हुसैनीवाली इमारतीच्या गोडाऊनमध्ये फळ विकण्याचा व्यवसाय करत होते.


मी मानखुर्दमध्ये राहतो. सकाळी ९.३० वाजता इमारत कोसळल्याचे कळाल्यानंतर मी येथे आलो. माझा भाचा आणि पुतण्याचा मृतदेह अजूनही माझ्या ताब्यात मिळालेला नाही. आम्हाला हे मृतदेह उत्तर प्रदेशातील भगवानपूर या गावी घेऊन जायचे आहेत.
- उस्मान अली मन्सूरी, मृताचे नातेवाईक


अन् 'तो' थोडक्यात बचावला

'देव तारी त्याला कोण मारी' ही म्हण हुसैनीवाला इमारतीत खजुराचा व्यापार करणाऱ्या सागीर अहमद (३१) च्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. इमारत कोसळणार इतक्यात तळ मजल्यावरील गाळ्यात झोपलेल्या सागीरला अज्ञात व्यक्तीने अक्षरश: हाताला धरून बाहेर खेचले. या घटनेत सागीरच्या हाताला थोडेफार खरचटले असले, तरी त्याचे लाखमोलाचे प्राण वाचले.



परंतु सगीरच्या दोन सख्ख्या भावाचे नशीब तेवढे चांगले नव्हते. या दुर्घटनेत रईस अहमद (२९) आणि नासिर अहमद (२४) या दोघांचाही मृत्यू झाला. सागीरचा भाचा कय्यूम मन्सूर याचाही दुर्घटनेत मृत्यू झाला असून गुचे अली या दुसऱ्या भाच्याचा अद्याप पत्ता लागलेला नाही.

या दुर्घटनेत सागीरचे प्राण वाचले असले तरी तो मानसिकदृष्ट्या चांगलाच खचला आहे. माझे दोन भाऊ आणि एक भाचा गेल्याचे दुःख सागीरने 'मुंबई लाइव्ह' शी बोलताना व्यक्त केले. बेपत्ता भाचा तरी सुखरूप असावा, अशी आशा त्याने व्यक्त केली.



हे देखील वाचा -

भेंडीबाजार इमारत दुर्घटनेला जबाबदार कोण? बुऱ्हाणी ट्रस्ट, म्हाडा, कि रहिवासी?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा