Advertisement

संभाजी भिडे रविवारी मुंबईत, पण कार्यक्रमाला परवानगी मिळणार का?


संभाजी भिडे रविवारी मुंबईत, पण कार्यक्रमाला परवानगी मिळणार का?
SHARES

भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल झालेले संभाजी भिडे गुरूजी रविवारी ७ जानेवारीला मुंबईत असणार आहेत. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मुंबईकडून रविवारी भिडे यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं आहे. मात्र हा व्याख्यानाचा कार्यक्रम आता वादात अडकला आहे. भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या अटकेची मागणी होत असल्याने तसेच ज्याप्रमाणे जिग्नेश मेवानी आणि उमर खलिदच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली त्याप्रमाणे भिडेंच्या कार्यक्रमालाही परवनागी देऊ नये, अशी मागणी होऊ लागल्याने भिडे यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला परवानगी मिळणार? की नाही याकडेच आता शिवप्रतिष्ठानचं लक्ष लागलं आहे.


महिन्याभरापासून कार्यक्रमाची आखणी

शिवप्रतिष्ठानतर्फे लालबागमधील मेघवाडी येथे रविवारी सायंकाळी ४.३० वाजता भिडे यांचे ३२ मण सुवर्ण सिंहासन आणि धारातीर्थ गडकोट मोहीम या विषयांवरील व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी शिवप्रतिष्ठानने २६ डिसेंबरलाच काळाचौकी पोलिस ठाण्यात परवानगीसाठी अर्ज केल्याची माहिती शिवप्रतिष्ठानचे धारकरी पुरूषोत्तम बाबर यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली आहे. तर हा कार्यक्रम पूर्वनियोजित असून महिन्याभरापासून कार्यक्रमाची आखणी केली जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.


पोलिसांची भेट घेणार

पण, आता या कार्यक्रमाला परवानगी मिळण्याची शक्यता मावळली आहे. पोलिसांना आम्ही अर्ज दिला असून त्यावर अद्याप त्यांच्याकडून कोणताही निर्णय झालेला नाही. पण आम्हाला आशा आहे की परवानगी मिळेल. परवानगी मिळावी यासाठी आम्ही शुक्रवारी काळाचौकी पोलिसांची भेट घेणार असल्याचंही बाबर यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता या कार्यक्रमाला परवानगी मिळते का? की जिग्नेश-उमर खलिदप्रमाणे भिडे यांच्या कार्यक्रमालाही परवानगी नाकारली जाते हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.



हेही वाचा-

छात्र भारतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, २५० हून अधिकजण ताब्यात

भीमा-कोरेगाव हिंसाचार: मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेंना अटक होणार-मुख्यमंत्र्यांचं आश्वासन


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा