Advertisement

भिवंडीत इमारत कोसळली, मृतांचा आकडा वाढला

आतापर्यंत या ढिगाऱ्यातून १२ जणांची सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे.

भिवंडीत इमारत कोसळली, मृतांचा आकडा वाढला
SHARES

भिवंडीच्या (वळपाडा) परिसरात शनिवारी एक तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

तीन मजली इमारत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली ४० ते ५० रहिवाशी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत या ढिगाऱ्यातून १२ जणांची सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे.

मौजे कैलासनगर (वळपाडा) येथे वर्धमान कंपाऊंडमध्ये शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास तीन मजली बिल्डिंग कोसळली आहे. 

बचाव पथकाने या ढिगाऱ्यातून आतापर्यंत सोनाली परमेश्वर कांबळे (वय - २२ वर्ष), शिवकुमार कांबळे (वय - २६ वर्ष), मुक्तार रोशन मंसुरी (वय - २६ वर्ष), चिकू रोहित सिंग (वय - ५ वर्ष), प्रिन्स रोहित सिंग (वय - ३ वर्ष), विकासकुमार मुकेश (वय - १८ वर्ष), उदयभान मुनिराम यादव (वय - २५ वर्ष), अनिता (वय - ३० वर्ष) यांची सुखरूप सुटका केलेली आहे.

घटनास्थळी TDRF चे २० जवान आणि NDRF ३५ जवानांची टीम तसेच ११ रुग्णवाहिका, भिवंडी अग्निशमन दलाची एक गाडी दाखल आहे. दुपारपासून बचावकार्य सुरु आहे. तसेच, श्वानपथकाच्या मदतीने शोधकार्य सुरु आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा