Advertisement

वाढत्या उकाड्यामुळे भाज्यांच्या दरात वाढ

राज्यात वाढलेल्या तापामानाचा फटका भाजीपाल्याला बसला आहे. भाज्यांच्या किंमती वाढल्या असून, अवाकही घटली आहे.

वाढत्या उकाड्यामुळे भाज्यांच्या दरात वाढ
SHARES

मुंबईसह राज्यभरातील तापमानात वाढ झाली आहे. या वाढत्या तापमानामुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, आणखी नवे संकट समोर उभं राहिलं आहे. राज्यात वाढलेल्या तापामानाचा फटका भाजीपाल्याला बसला आहे. भाज्यांच्या किंमती वाढल्या असून, अवाकही घटली आहे.

मुंबईत यंदा उन्हाचा तडाखा लवकर जाणवू लागला आहे. त्याचा परिणाम मुंबईच्या बाजारांमधील भाज्यांची आवक व दरांवरही झाला आहे. बटाटे-कांदे ५० रुपये किलो दरानं झालेले असताना सगळ्याच भाज्या ८० ते १०० रुपये किलो इतक्या महाग झाल्या आहेत. किरकोळ भाजीविक्रेते दररोज सरासरी १०० ते १२० किलो भाजी विक्री करतात. मात्र, मागील ३ ते ४ दिवसांत ऊन तापल्याने आवक घटली आहे. सध्या दररोज जेमतेम ८० ते १०० किलो भाजीविक्रेत्याकडे येत आहे. त्यातूनच दर वधारले आहेत.

मागील महिन्यापर्यंत मुंबईत कांदे ४० तर बटाटे ३० रुपये किलोदरम्यान होते. आता बहुतांश ठिकाणी दोन्ही दर ५० रुपये प्रति किलोवर गेले आहेत. तर भेंडी, तोंडली, फरसबी, पडवळ यासारख्या इतरवेळीही आवक कमी असलेल्या भाज्यांचे दर आता १०० रुपये किलोवर गेले आहेत. आतापर्यंत ४० ते ६० रुपये किलोदरम्यान असलेली भाजी आता ८० रुपये प्रती किलोच्या आसपास पोहोचली आहे. यामुळे यंदाचा उन्हाळा सर्वसामान्यांना आर्थिक फटका देण्याची दाट शक्यता आहे.

भाज्याचे सध्याचे दर

  • कांदे ४०-४५
  • बटाटे ४५-५०
  • टोमॅटो ५०-६०
  • भेंडी १००
  • ढोबळी मिरची १००
  • तोंडली १००-११०
  • काकडी ६०
  • कोबी ६०
  • फुलकोबी १००-१२०
  • दुधी भोपळा ६०
  • लाल भोपळा ६०
  • फरसबी १००-१२०
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा