Advertisement

पॉवर हाऊस स्फोटात चौघे जखमी


पॉवर हाऊस स्फोटात चौघे जखमी
SHARES

चेंबूरच्या वामन तुकाराम पाटील मार्गावरील आयडियल देवजी केशवजी इंडस्ट्रीयल ईस्टेट येथील पॉवर हाऊसमध्ये शनिवारी सकाळी बिघाड झाला होता. त्यामुळे याठिकाणी रिलायन्स एनर्जीकडून दुरुस्तीचे काम सुरू होते. दरम्यान पॉवर हाऊसमध्ये दुरुस्तीचे काम सुरु असताना अचानक स्फोट होऊन आग लागल्याने यामध्ये काम करणारे चार कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. 

शैलेश राणे(35),रमेश गडाम (30),बी.ओक (40) आणि एस. घाग (55) अशी या कर्मचाऱ्यांची नावे असून, यातील तिघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एकावर गोदरेज रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती गोवंडी पोलिसांनी दिली आहे. स्फोटाचे कारण अद्यापही कळले नसून, याबाबत अधिक तपास सुरु असल्याची माहिती गोवंडी पोलिसांनी दिली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा