Advertisement

पावसाळ्यापूर्वीच गिरगाव चौपाटीवर आढळले विषारी 'ब्लू बटण' जेलीफिश

पावसाळ्यात दरवर्षी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर विषारी जेलीफिश दाखल होतात. मात्र, यंदा हे विषारी जेलीफिश पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आले आहेत. गिरगाव चौपाटीवर हे विषारी ब्लू जेलीफिश आढळत आहेत.

पावसाळ्यापूर्वीच गिरगाव चौपाटीवर आढळले विषारी 'ब्लू बटण' जेलीफिश
SHARES

पावसाळ्यात दरवर्षी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर विषारी जेलीफिश दाखल होतात. मात्र, यंदा हे विषारी जेलीफिश पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आले आहेत. गिरगाव चौपाटीवर हे विषारी ब्लू जेलीफिश आढळत आहेत. त्यामुळं महापालिकेनं मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इसारा दिला आहे. मात्र, गिरगाव चौपाटीवर पर्यटकांची प्रचंड गर्दी असते त्यामुळं आता पर्यटकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. 

प्रजननाचा काळ

गिरगाव चौपाटीच्या किनाऱ्यावर हे जेलीफिश आढळले असले, तरी इतर समुद्र किनाऱ्यांवरही जेलीफिश येण्याची शक्यता आहे. पावसाच्या सुरुवातीला हे जेलीफिश आढळतात. त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात समुद्राच्या पाण्याच्या वरच्या थराचं तापमान वाढलं आणि हवामान बदलल्यावर जेलीफिश अंडी सोडण्यासाठी किनाऱ्यावर येतात. हा त्यांचा प्रजननाचा काळ असून, त्यासाठी वातावरण पोषक असतेपावसाळ्याआधी ‘ब्लू बटण’ त्यानंतर ‘ब्लू बॉटल’ व इतर जेलीफिश किनाऱ्यावर येण्यास सुरूवात होते.

विषारी जेलीफिश 

चौपाट्यांवर येणारे हे जेलीफिश विषारी असून त्यांच्या चाव्यानं अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. २०१४ मध्ये दीड दिवसाच्या गणपती विसर्जना वेळी जेलीफीश किनाऱ्यावर आले होते. त्यावेळी जेलीफिशच्या चाव्याने अनेक भाविक जखमी झाले होते.



हेही वाचा -

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे अडचणीत, सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार

शिखर धवन दुखापतग्रस्त, ३ आठवड्यांसाठी संघाबाहेर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा