Advertisement

शिखर धवन दुखापतग्रस्त, ३ आठवड्यांसाठी संघाबाहेर

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला गंभीर दुखापत झाल्यानं त्याला ३ आठवड्यांसाठी संघाबाहेर राहावं लागणार आहे. यामुळे त्याला वर्ल्डकपमधील उर्वरीत सामन्यांमध्ये खेळता येणार नाही. टीम इंडियासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

शिखर धवन दुखापतग्रस्त, ३ आठवड्यांसाठी संघाबाहेर
SHARES

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला गंभीर दुखापत झाल्यानं त्याला ३ आठवड्यांसाठी संघाबाहेर राहावं लागणार आहे. यामुळे त्याला वर्ल्डकपमधील उर्वरीत सामन्यांमध्ये खेळता येणार नाही. टीम इंडियासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात शिखर धवनच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्याच्या हाताचा एक्स रे काढल्यावर त्यात अंगठा फ्रॅक्चर झाल्याचं आढळून आलं आहे. फाॅर्मात आलेला धवन संघात नसल्यामुळं भारतीय संघाला सलामीवीर फलंदाजाची अडचण भासण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

दमदार शतक

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शिखरने दमदार शतक ठोकलं होतं. त्याने आॅस्ट्रेलियाची गोलंदाजी फोडून काढत १०९ चेंडूत १६ चौकार मारत ११७ धावा केल्या. शिखर फॉर्मात आलेला असतानाच त्याला दुखापत झाल्यानं भारतीय संघाला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.

राहुल सलामीवीर?

भारताचा पुढील सामना १३ जून रोजी न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. त्यामुळं या सामन्यात शिखर धवनची जागा कोण घेणार याकडं सगळ्यांचं लक्षं लागलं आहे. के. एल. राहुल रोहीम शर्मासोबत सलामीला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



हेही वाचा -

दहावी निकाल: निकालाच्या प्रतीसाठी ६२० विद्यार्थ्यांचे अर्ज

आषाढी एकादशीनिमित्त एसटीच्या जादा फेऱ्या



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा