Advertisement

दहावी निकाल: निकालाच्या प्रतीसाठी ६२० विद्यार्थ्यांचे अर्ज

मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड येथील ६२० विद्यार्थ्यांनी निकालाची फोटोकॉपी मिळवण्यासाठी अर्ज केले आहेत. तसंच, १३३ विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले आहेत.

दहावी निकाल: निकालाच्या प्रतीसाठी ६२० विद्यार्थ्यांचे अर्ज
SHARES

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीन घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शनिवार ८ जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदा दहावीच्या परीक्षेत आर्या बेलवालकर राज्यात पहिली आली असून तिला ९८.८ टक्के मिळाले आहेत. तसंच, अनेक विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उतीर्ण झाले आहेत. परंतु, हे विद्यार्थी त्यांना मिळालेल्या गुणांबाबत समाधानी नाहीत. त्यामुळं काही विद्यार्थ्यांनी वाशी विभागीय मंडळाकडं पुनर्मूल्यांकनासाठी आणि निकालाच्या प्रतीसाठी अर्ज केले आहेत.

विद्यार्थ्यांचे अर्ज

मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड येथील ६२० विद्यार्थ्यांनी निकालाची फोटोकॉपीसाठी अर्ज केले आहेत. तसंच, १३३ विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले आहेत. गुणांची पडताळणी करण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ जून असून, प्रत्येक विषयासाठी ५० रुपये भरावे लागणार आहेत. निकालाच्या फोटोकॉपीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ जून आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाच्या फोटोकॉपीसाठी ४०० रुपये भरावे लागणार असून पुनर्मूल्यांकनासाठी प्रत्येक विषयाकरीता ३०० रुपये भरावे लागणार आहेत.

मुंबईचा निकाल ७७.०४ टक्के

यंदा दहावीचा निकाल राज्यात ७७.१० टक्के लागला असून मागील वर्षाच्या तुलनेत १२ टक्क्यांनी घसरला आहे. निकालामध्ये कोकण विभागानं (८८.३८ टक्के) बाजी मारली असून, सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (६७.२७ टक्के) लागला. तर मुंबई विभागाचा निकाल ७७.०४ टक्के इतका लागला आहे.हेही वाचा -

पावसाळ्यात झाडाखाली उभं राहू नका; पालिकेचा मुंबईकरांना सावधानतेचा इशारा

आषाढी एकादशीनिमित्त एसटीच्या जादा फेऱ्याRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा