Advertisement

आषाढी एकादशीनिमित्त एसटीच्या जादा फेऱ्या

एसटी महामंडळानं आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनास जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी ३ हजार ७२४ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

आषाढी एकादशीनिमित्त एसटीच्या जादा फेऱ्या
SHARES

दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून अनेक भाविक पंढपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनास मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. पंढपूरला जाण्यासाठी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी, एसटीतर्फे जादा बसगाड्या सोडण्यात येतात. यंदाही एसटी महामंडळानं आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनास जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी ३ हजार ७२४ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीचे सुमारे ५ हजार चालक-वाहक, व इतर कर्मचारीवर्ग येत्या १० ते १६ जुलै दरम्यान पंढरपूर येथे प्रवाशांच्या सोयीसाठी तत्पर राहणार आहे.

वाहतुकीचं नियोज

एसटी महामंडळातर्फे आषाढी यात्रेसाठी विशेष वाहतुकीचं नियोजन केलं जातं. यंदाही एसटीनं आषाढी एकादशीनिमित्त वाहतूक नियोजनासाठी पुणे इथं एका बैठकीचं आयोजन केलं होतं. पंढरपूरची आषाढी वारी जगभरात प्रसिद्ध असून महाराष्ट्राच्याच कानाकोपऱ्यातून नव्हे, तर इतर राज्यांतूनही भाविक या यात्रेसाठी येत असतात. त्यामुळे वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बसेस तांत्रिकदृष्ट्या दोषरहित असाव्यात, त्या स्वच्छ व आकर्षक असल्या पाहिजेत याबाबत संबंधित विभागांनी दक्ष राहण्याचे आदेश परिवहनमंत्री व महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले.

'विठाई' बस तैनात

एसटी महामंडळानं काही महिन्यांपूर्वीच माइल्ड स्टीलचा वापर करून १२०० बसेसची नव्यानं बांधणी केली आहे. या नव्यानं बांधणी केलेल्या मजबूत अशा १२०० आकर्षक बसेस भाविकांच्या सोयीसाठी यंदा वापरण्यात येणार आहेत. तसंच, 'विठाई' बसेस देखील भाविकांच्या सोयीसाठी तैनात करण्यात येणार आहेत. पंढरपूरकडं येणाऱ्या विविध प्रमुख मार्गांवर राज्यभरात एसटीची दुरुस्ती पथकं तैनात करण्यात येणार आहेत.


नाव
बसेस
संभाजीनगर
१०९७
पुणे
१०८०
नाशिक
६९२
अमरावती
५३३
मुंबई
२१२
नागपूर
११०हेही वाचा -

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक

शिवडी अपघात प्रकरण: मृतांच्या नातेवाईकांची आरोपीविरोधात अजामीनपात्र गुन्हा नोंदविण्याची मागणीसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा