Advertisement

पावसाळ्यात झाडाखाली उभं राहू नका; पालिकेचा मुंबईकरांना सावधानतेचा इशारा

यंदा पावसाळ्यात पालिकेनं मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. मुंबई महापालिकेनं झाडांवर पोस्टर्स लावून मुंबईकरांना सूचना केली आहे.

पावसाळ्यात झाडाखाली उभं राहू नका; पालिकेचा मुंबईकरांना सावधानतेचा इशारा
SHARES

पावासाळ्यात अनेकदा मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस पडल्यानं झाडे कोसळून दुर्घटना घडतात. झाडं कोसळ्यानं काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काहींच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं यंदाच्या पावसाळ्यात अशा घटना घडू नये यासाठी पालिकेनं मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. मुंबई महापालिकेनं झाडांवर पोस्टर्स लावून मुंबईकरांना सूचना केली आहे. 'मोठा पाऊस आला किंवा जोराचा वादळी वारा आला तर झाडाची फांदी तुटेल अथवा झाडं पडण्याची घटना घडेल. त्यामुळं सावधान राहा. झाडाखाली उभं राहू नका' असे सूचना देणारे पोस्टर्स माटुंगा विभागात वेगवेगळ्या झाडांना लावण्यात आले आहेत.

झाडांवर पोस्टर्स

पावसाळ्यात मुंबईकर रस्त्यात, रेल्वे प्रवासात तसंच कोणत्याच ठिकाणी सुरक्षित नसतो. रस्त्यावरून चालताना झाडं कोसळ्याची भिती, रेल्वे प्रवासादरम्यान लोकल रद्द होण्याची भिती, तसंच वाहनांनी प्रवास करताना पाणी तुंबल्यामुळं येणारे अडथळे. यामुळं मुंबईकरांना अनेक त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यामुळं पावसाळ्यात मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी पालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येतात. याच पार्श्वभूमीवर यंदा मुंबई महापालिकेनं मुंबईतील विविध भागातील झाडांवर पोस्टर्स लावून मुंबईकरांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

झाडांचं सर्वेक्षण

मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून झाडांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे. पालिकेच्या वृक्षगणानुसार, महापालिका क्षेत्रात एकूण २९ लाख ७५ हजार २८३ झाडं आहेत. यांपैकी १५ लाख ६३ हजार ७०१ झाडं खासगी आवारांमध्ये आहेत. तसंच, ११ लाख २५ हजार १८२ एवढी झाडं शासकीय परिसरांमध्ये आहेत. या व्यतिरिक्त १ लाख ८५ हजार ३३३ झाडं ही रस्त्यांच्या कडेला असून, १ लाख १ हजार ६७ एवढी झाडं विविध उद्यानांमध्ये आहेत.हेही वाचा -

कांदिवलीत विजेचा शॉक लागून २ चिमुकल्यांचा मृत्यू

वैद्यकीय सेवा खासगीकरणाच्या प्रक्रियेविरुद्ध कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलनRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा