Advertisement

मुंबईभर फिरणार प्लास्टिक बंदी जनजागृतीचा रथ

महाराष्ट्रात प्लास्टिक आणि थर्माकोल बंदी झाल्यानंतर मुंबईत प्लास्टिक बंदीबाबत जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. याच जनजागृतीचा एक भाग म्हणून प्लास्टिक बंदीबाबतची माहिती जनतेला व्हावी याकरता महापालिकेच्या नियोजन विभागाच्या माध्यमातून रथ बनवण्यात येत आहे.

मुंबईभर फिरणार प्लास्टिक बंदी जनजागृतीचा रथ
SHARES

१ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजी पार्क मैदानावर संचालनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या संचलनात मुंबई महापालिकेचा प्लास्टिक बंदी जनजागृतीचा रथ सर्वांचं लक्ष वेधून घेणार आहे. हा रथ त्यानंतर पुढील ३ दिवस संपूर्ण मुंबईत फिरून नागरिकांमध्ये जनजागृतीही करणार आहे.



आकर्षण काय?

महाराष्ट्रात प्लास्टिक आणि थर्माकोल बंदी झाल्यानंतर मुंबईत प्लास्टिक बंदीबाबत जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. याच जनजागृतीचा एक भाग म्हणून प्लास्टिक बंदीबाबतची माहिती जनतेला व्हावी याकरता महापालिकेच्या नियोजन विभागाच्या माध्यमातून रथ बनवण्यात येत आहे. या रथावरील मोठी ज्यूट पिशवी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आहे. प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम दर्शवणाऱ्या पोस्टरने हा रथ बनवण्यात आला असून त्यावर एलईडीच्या माध्यमातून प्लास्टिक बंदीची माहितीही दिली जाणार आहे.



कुणी तयार केला?

कलादिग्दर्शक सुरेश तारकर यांच्या मार्गदर्शनाखाली या रथावर शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरु आहे. मंगळवारी शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात महापालिकेच्यावतीने हा रथ फिरून सर्वांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करणार आहे.



मंगळवारनंतर हा रथ दादर येवून रवाना होऊन पुढील ३ दिवस मुंबईतील विविध भागांमध्ये फिरणार असल्याची माहिती महापालिका घनकचरा विभागाचे सहायक आयुक्त व प्लास्टिक बंदी जनजागृती कार्यक्रमाचे समन्वयक किरण दिघावकर यांनी दिली.



हेही वाचा-

प्लास्टिक बंदीला स्थगिती नाहीच- उच्च न्यायालय

आधी सरकारकडे जा, उच्च न्यायालयाने प्लास्टिक उत्पादकांना सुनावलं



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा