सलमानच्या घरासमोरील शौचालय हटवण्यास प्रशासनाचा नकार

Bandra west
सलमानच्या घरासमोरील शौचालय हटवण्यास प्रशासनाचा नकार
सलमानच्या घरासमोरील शौचालय हटवण्यास प्रशासनाचा नकार
See all
मुंबई  -  

सलमान खान याच्या घरासमोरील सार्वजनिक शौचालय हटवण्यास प्रशासनाने नकार दिला आहे. सलमानचे वडील सलीम खान यांनी घरासमोरील सार्वजनिक शौचालय हटवण्याची मागणी केली होती. यासंबधी त्यांनी घरासमोरील सार्वजनिक टॉयलेटमुळे गैरसोय होत असल्याने ते हलवण्यात यावे, असं कारण देत महापौरांना पत्र देखील लिहिलं होतं. मात्र प्रशासनाने सलीम खान यांची मागणी फेटाळून लावत सार्वजनिक शौचालय हटवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. शौचालय स्वच्छ ठेवण्यासाठी काळजी घेतली जाईल, मात्र ते अन्यत्र हलवलं जाणार नाही, असं उत्तर प्रशासनाकडून महापौरांना पाठवलं जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हागणदारीमुक्त स्वच्छ मुंबई या योजनेचा सलमान खान ब्रँड अॅम्बेसेडर आहे. त्याच्याच कुटुंबाकडून अशा प्रकारे शौचालयाला विरोध होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ज्या योजनेसाठी मोठ्या अभिमानानं सलमानची ब्रॅण्ड अॅम्बेसिडरपदी निवड करण्यात आली होती, त्याच योजनेसाठी सलमानच्या कुटुंबाकडून नाक मुरडले जात आहे. स्वच्छ मुंबईच्या उपक्रमाअंतर्गत सलमानच्या घराजवळील परिसरात बॅण्डस्टॅण्डजवळ सार्वजनिक शौचालय बांधण्यात येत आहे. पण, याला आता सलमानच्याच कुटुंबियांनी हरकत घेतली आहे. 

सलमानचे वडील आणि ज्येष्ठ लेखक सलीम खान, अभिनेत्री वहिदा रेहमान यांनी सार्वजनिक शौचालय त्यांच्या घराजवळील परिसरात बांधू नये, अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी स्वाक्षरी मोहीम देखील राबवली. सलीम खान यांच्या पत्राची दखल घेत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी एच पश्चिमचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांना पत्र लिहून या संदर्भात कार्यवाही करण्यासंबंधी सुचवलं होतं. मात्र मुतारी सुरुही झाली नसताना केवळ दुर्गंधीच्या शक्यतेने रहिवासी त्याला विरोध करत असल्याचं पालिकेच्या अधिका-यांनी स्पष्ट केले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.