Advertisement

रस्त्यांवरील सर्व कामे १५ मे पूर्वी पूर्ण करावीत, अन्यथा कारावाई - महापालिका प्रशासक

मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ मंगळवार ८ मार्च रोजी संपुष्ठात आला. त्यामुळं येत्या अगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांपर्यंत महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे.

रस्त्यांवरील सर्व कामे १५ मे पूर्वी पूर्ण करावीत, अन्यथा कारावाई - महापालिका प्रशासक
SHARES

मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ मंगळवार ८ मार्च रोजी संपुष्ठात आला. त्यामुळं येत्या अगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांपर्यंत महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. इक्बाल सिंह चहल यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली असून, नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यावर आणि मुंबई महापालिकेचा कारभार पूर्णपणे ताब्यात आल्यानंतर डॉ. इक्बाल सिंह चहल अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. प्रशासक चहल यांनी मंगळवारी मान्सूनपूर्व बैठक घेतली असून, रस्त्यावरील सुरू असलेली कामे १५ मे पूर्वी पूर्ण करावीत. अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी निर्देश दिले.

प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी मंगळवारी सर्व विभागप्रमुख, अधिकाऱ्यांसह महानगरातील विविध प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. या बैठकीत मान्सूनपूर्व पूर्ण कामाच्या तयारीचा त्यांनी आढावा घेतला. शहर व उपनगरात  सुरू असलेली मेट्रो, मोनो म्हाडा व एमएमआरडीएकडून सुरू असलेली रस्त्यावरील कामं १५ मे पूर्वी पूर्ण करावीत. त्यानंतर रस्त्यावर राडारोडा (डेब्रिज) न हटविल्यास संबंधिताविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करण्याचे निर्देश चहल यांनी अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीला 'बेस्ट'चे महाव्यवस्थापक लोकेशचंद्र, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, संबंधित सहआयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विविध खात्यांचे प्रमुख यांच्यासह आपत्कालीन व्यवस्थापन खात्याचे संचालक महेश नार्वेकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंगळवारी झालेल्या बैठकीत आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेतला. यावेळी मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांसह महानगरपालिका क्षेत्रातील ज्या-ज्या यंत्रणेद्वारे विविध स्तरीय कार्यवाही केली जाते. त्या सर्व यंत्रणांनी आपापल्या स्तरावर नियमितपणे कामांची पाहणी करावी, सर्व संबंधित कामे वेळच्या वेळी पूर्ण करावीत आणि इतर यंत्रणांसोबत सुसमन्वय साधावा, असे निर्देश दिले.

विविध सेवा देणाऱ्या संस्थांद्वारे उपयोगितांसाठी रस्ते-पदपथ खोदले जातात. त्याठिकाणचा राडारोडा वेळच्यावेळी न हटविल्यास तो पावसामुळे वाहून त्या  ठिकाणी पाणी तुंबू शकते. त्यामुळे वेळच्यावेळी राडारोडा न हटविणाऱ्या संस्थांविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्याची सूचना सर्व संबंधित सहआयुक्त व उपायुक्तांना  दिली. पावसाळापूर्व विविध कामे ही निर्धारित वेळेत करा, असे सांगून ते म्हणाले, पावसाच्या पाण्याचा निचरा संथगतीने होणाऱ्या ठिकाणी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा