Advertisement

महापालिकेचे सौरऊर्जेच्या दिशेने नवं पाऊल


महापालिकेचे सौरऊर्जेच्या दिशेने नवं पाऊल
SHARES

भांडुपच्या सौरऊर्जा प्रकल्पाचा दिवसेंदिवस वाढत जाणारा खर्च लक्षात घेता, महापालिकेने सौरऊर्जेवर वीजनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिका भांडुप संकुल परिसरात12.5 मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. यासाठी सुमारे 8 कोटी 22 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. 

भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात दररोज 2,300 दशलक्ष लिटर पाणी शुद्ध केलं जातं. यासाठी साधारण वर्षाला 5 कोटी 4 लाख युनिट एवढी वीज खर्च होते. त्यावर वर्षाला 42 कोटी खर्च होतो. हा वीज खर्च कमी करण्यासाठी महापालिका 'आय.आय.टी. मुंबई 'च्या सहकार्याने 12.5 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पामुळे विजखर्चात 33 टक्के बचत होऊ शकेल. पहिल्या टप्यात सुमारे 26 हजार चौरस मीटर जागेवर प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. यातून दरवर्षी 35 लक्ष युनिट वीज निर्मिती केली जाईल. 

त्यामुळे 3 कोटींची बचत केली जाईल. 2018 पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होईल. तर दुसऱ्या प्रकल्पात 10 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या सौरऊर्जा प्रकल्पातून तयार होणारी वीज विद्युत प्रकल्पला जोडली जाणार आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी देशात पहिल्यांदाच सौर ऊर्जेचा वापर केला जाणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा