महापरिनिर्वाण दिनानिमित्त तयारी सृुरू

  Dadar
  महापरिनिर्वाण दिनानिमित्त तयारी सृुरू
  मुंबई  -  

  मुंबई - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना चांगल्या सुविधा देण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने तयारी करावी, असे निर्देश कोकण विभागाचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिले.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या सख्येंने अनुयायी चैत्यभूमी येथे येत असतात. या अनुयायांना योग्य त्या सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पोलीस खाते तयारी करत आहे. अनुयायांना चांगल्या सुविधा मिळण्याबरोबरच त्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, असे अनेक आदेश देशमुख यांनी या वेळी दिले. महापरिनिर्वाण दिनाच्या तयारी संबंधीची आढावा बैठक विभागीय आयुक्त कोकण यांच्या दालनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी डॉ.अश्विनी जोशी, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.