Advertisement

मुंबईकरांना दिलासा, अर्थसंकल्पात टॅक्सबाबात पालिकेचा मोठा निर्णय

गेल्या वर्षीच्या तुलनेत बजेटमध्ये 14.52 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मुंबईकरांना दिलासा, अर्थसंकल्पात टॅक्सबाबात पालिकेचा मोठा निर्णय
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शनिवारी (आज) 52,619 कोटी रुपयांचा पालिकेचा अर्थसंकल्प (BMC Budget 2023-24) सादर केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत बजेटमध्ये (BMC budget) 14.52 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2022-23 चा अर्थसंकल्प अंदाज 45,949.21 कोटी रुपये होता. (Mumbai Tax)

अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू यांनी आज पालिका मुख्यालयात प्रशासक इक्बाल सिंग चहल यांना बजेट सादर केला. त्यानंतर पालिका आयुक्त इक्बाल सिंग यांनी पत्रकार परिषद घेत बजेट सादर केले.

सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुंबईकरांना (Mumbaikar) दिलासा देण्यात आला आहे. मुंबई पालिका अर्थसंकल्पात यंदा करामध्ये कुठलीच वाढ करण्यात आली नाही.

2022 - 23 या आर्थिक वर्षात, मालमत्ता करातून उत्पन्नाचा दुसरा सर्वोच्च स्त्रोत 7000 कोटी रुपयांचा अंदाज होता, जो रुपये 4800 कोटी इतका सुधारला गेला आहे.

पालिकेने पुढे सांगितले की डीपी विभागाकडून 4,400 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे, तर मालमत्ता करातून मिळणारे उत्पन्न 6,000 कोटी रुपये अपेक्षित आहे.

पालिकेला गुंतवणुकीवर रुपये 1707 कोटी व्याज मिळण्याची अपेक्षा आहे. पाणी शुल्क आणि सांडपाणी यातून रुपये 1965 महसूल मिळणे अपेक्षित आहे. ६४ कोटी आणि जकातीच्या बदल्यात शासनाकडून अनुदान रु. 12344.10 कोटी इतके आहे.



हेही वाचा

BMC Budget 2023-24: मुंबईतल्या 'या' 5 गजबजलेल्या भागात एअर प्युरिफायर उभारणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा