Advertisement

महापालिकेच्या १३८८ कामगारांच्या भरतीसाठी ३ लाख ६७ हजार अर्ज


महापालिकेच्या १३८८ कामगारांच्या भरतीसाठी ३ लाख ६७ हजार अर्ज
SHARES

मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणीतील कामगारांच्या १३८८ जागांसाठी तब्बल ३ लाख ६७  हजार अर्जांची नोंदणी झाली आहे. यापैकी १ जानेवारीपर्यंत सुमारे २ लाख ८२ उमेदवारांनी अनामत रक्कम भरली असून सोमवारी रात्रीपर्यंत अनामत रक्कम भरण्याची मुदत असल्याने ही संख्या ३ लाखांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेतील जलविभाग, आरोग्य खाते, रुग्णालये, मलनि:सारण आदी अत्यावश्यक विभागांमध्ये कामगारांची पदे रिक्त आहेत. या सर्व विभागात कामगार, कक्षपरिचर, हमाल, आया, स्मशान कामगार आदी वर्गांतील १३८८ रिक्तपदे सरळ सेवेने भरली जात आहेत.

ही संपूर्ण भरती  राज्य शासन आणि टाटा कन्सल्टंन्सी सर्विसेसचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाऑनलाईन लिमिटेड या कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे.  ११ डिसेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत स्वीकारण्यात आलेल्या ऑनलाईन पद्धतीत  एकूण  ३  लाख ६६ हजार ९९४ अर्जाची नोंदणी झाली आहे. यामध्ये १ जानेवारीला दुपारपर्यंत २ लाख ८२ हजार २३३ उमेदवारांनी ऑनलाईन अर्जासोबत अनामत रक्कम भरली आहे. मात्र, सोमवारी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत अनामत रक्कम भरण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे या पदांसाठी सुमारे ३ लाख अर्ज होतील, असा विश्वास महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला.

या भरतीसाठी सुमारे ४ लाख अर्ज प्राप्त होतील, असा प्राथमिक अंदाज होता. यामध्ये खुला प्रवर्ग व मागास तसेच इतर मागास प्रवर्गातून प्रत्येकी २ लाख उमेदवारांचे अर्ज येतील, असा अंदाज होता. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी ८०० रुपये व मागास व इतर मागास प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी ४०० रुपये शुल्क आकारण्यात आले होते.



हेही वाचा-

महापालिका कामगार भरती प्रक्रिया : ऑनलाईन अर्जात फक्त माहिती हवी, कागदपत्रे नाही!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा