Advertisement

महापालिका कामगार भरती प्रक्रिया : ऑनलाईन अर्जात फक्त माहिती हवी, कागदपत्रे नाही!

मुंबई महापालिकेतील कामगार पदाच्या १३८८ जागांसाठी होणाऱ्या भरतीत महिलांसाठी ३० टक्के अर्थात ४१६ जागा राखीव आहेत. तर, भूकंपग्रस्तांसाठी २८ जागा आणि महापालिकेच्या प्रकल्पांमधील बाधित प्रकल्पग्रस्तांसाठी ६९ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

महापालिका कामगार भरती प्रक्रिया : ऑनलाईन अर्जात फक्त माहिती हवी, कागदपत्रे नाही!
SHARES

मुंबई महापालिकेतील कामगार पदाच्या १३८८ जागांसाठी होणाऱ्या भरतीत महिलांसाठी ३० टक्के अर्थात ४१६ जागा राखीव आहेत. तर, भूकंपग्रस्तांसाठी २८ जागा आणि महापालिकेच्या प्रकल्पांमधील बाधित प्रकल्पग्रस्तांसाठी ६९ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, या ऑनलाईन अर्जावेळी उमेदवारांना केवळ आपली माहिती, तसेच छायाचित्र आणि स्वाक्षरी स्कॅन करून भरायची आहे. शैक्षणिक व इतर प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती आणि छायांकित प्रती या नियुक्तीपूर्वी सादर करायच्या आहेत. त्यामुळे कोणतीही कागदपत्रे न देता हा अर्ज भरताना आपला इमेल आयडी, तसेच पत्रव्यवहाराचा पत्ता हा सुस्पष्ट असावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणीतील कामगारांच्या १३८८ पदांची भरती प्रक्रियेला येत्या सोमवार दिनांक ११ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. मात्र, या भरतीत इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरीत झालेल्या मागासवर्गीय उमेदवारांचा आरक्षित पदांकरता विचार केला जाणार नाही.


ऑनलाईन अर्ज कसा भराल?

१. हे अर्ज http://portal.mcgm.gov.in या किंवा https://mcgmlabourrecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असतील

२. संकेतस्थळावर भेट देऊन ‘Labour Recruitment 2017’ या लिंकवर क्लिक करावे

३. ४.५ सें.मी x ३.५ सें.मी आकाराचे छायाचित्र (फोटो) व सही स्कॅन करून अपलोड करावे

४. ऑनलाईन पेमेंट आदींची पूर्तता केल्यानंतर उमेदवारांना एक अर्ज क्रमांक दिला जाईल


अर्ज भरतेवेळी काय घ्याल काळजी?

१. उमेदवाराने अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून स्वत:जवळ ठेवावी

२. ऑनलाईन लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र, परिक्षा केंद्र याबाबतच्या सर्व सूचना मुंबई महापालिकेच्या http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत

३. उमेदवाराचा ई-मेल आयडी आणि पत्रव्यवहाराचा पत्ता (पिनकोडसह) सुस्पष्ट असावा

४. ऑनलाईन अर्ज भरताना काही त्रुटी राहिल्यास अर्ज संगणकाद्वारे स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज परिपूर्ण भरण्याची दक्षता घ्यावी.

५. भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज अपात्र ठरला तर उमेदवाराने भरलेले भरती प्रक्रिया शुल्क परत केले जाणार नाही.

६. पोस्टाने अथवा इतर कोणत्याही प्रकारे आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.

७. उमेदवाराने भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अन्य माध्यमांचा अवलंब केल्यास किंवा तोतया व्यक्तीची व्यवस्था केल्याचे आढळल्यास त्या उमेदवाराला अपात्र ठरवण्यात येणार आहे.

दरम्यान, उमेदवार उच्च शिक्षित असला तरी त्याला जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांपैकी कोणत्याही पदावर काम करणे बंधनकारक राहणार असल्याचे पालिकेकडून नमूद करण्यात आले आहे. तसेच, उमेदवाराची कामगार प्रवर्ग सोडून किंवा इतर कोणत्याही खात्यातील पदावर काम करण्याची विनंती भविष्यातदेखील मान्य होणार नाही.


प्रक्रिया पारदर्शीच, आमिषांना भुलू नका!

मध्यस्थ, ठक तसेच मुंबई महापालिकेत संबंध असल्याचे भासविणाऱ्या व्यक्ती यांच्या गैर मार्गाने नोकरी मिळवून देणाऱ्या आश्वासनांपासून सावध राहावे. ही भरती अत्यंत पारदर्शक असून कोणाचाही हस्तक्षेप यात चालणार नाही. त्यामुळे नोकरीच्या अमिषाला भाळून कोणाशीही आर्थिक व्यवहार करून आपली फसवणूक करून घेऊ नका, असे आवाहन महापालिकेने केले आहे.


किती असेल परीक्षा शुल्क?

खुल्या प्रवर्गासाठी ८०० रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४०० रुपये इतके परीक्षा शुल्क भरावे लागेल. माजी सैनिकांना कोणत्याही स्वरूपात परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, भरती प्रक्रिया शुल्क जाहिरातीत नमूद केलेल्या पद्धतीनुसार परीक्षा शुल्क नेट बॅकिंग पद्धतीने, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरुन भरता येईल.



हेही वाचा

गुडन्यूज...सिडकोत 57 जागांसाठी भरती!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा