Advertisement

गुडन्यूज...सिडकोत 57 जागांसाठी भरती!


गुडन्यूज...सिडकोत 57 जागांसाठी भरती!
SHARES

नोकरीच्या शोधात त्यातही सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. सिडकोमध्ये विविध पदांच्या एकूण 57 जागा भरल्या जाणार असून या भरती प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले असून 27 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

प्रोगॅमर, फील्ड ऑफिसर (जनरल), फील्ड ऑफिसर (सोशल सर्व्हिस), लिपिक, टंकलेखक, कम्प्युटर ऑपरेटर, लेखा लिपिक अशा एकूण 57 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सिडकोच्या www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर यासंबधीची सविस्तर माहिती उपलब्ध आहे.



या पदांसाठी भरल्या जात आहेत जागा

प्रोग्रॅमर - 1 जागा
फील्ड ऑफीसर (जनरल) - 4 जागा
फील्ड ऑफिसर (सोशल) - 1 जागा
लिपिक टंकलेखक - 27 जागा
कम्प्युटर ऑपरेटर - 3 जागा
लेखा लिपिक - 21 जागा

या पदासाठी अर्जदाराचे वय 1 ऑक्टोबर 2017 रोजी 18 ते 38 वर्षे असायला हवे. तर मागासवर्गीय अर्जदारांसाठी पाच वर्षांची सूट असेल. 7 नोव्हेंबरपासून ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरण्यास सुरूवात झाली असून 27 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
अर्जासोबत अर्जदारांना 500 रूपये शुल्क भरावे लागणार आहे. सर्वसाधारण गटातील अर्जदारांसाठी 500 रुपये शुल्क असणार आहे, तर सामाजिक आरक्षणातील अर्जदारांसाठी हे शुल्क 250 रुपये इतके आहे. या शुल्काची रक्कम ऑनलाईन प्रक्रियेद्वारेच अर्जदारांना करावी लागणार आहे.


शैक्षणिक पात्रता

प्रोग्रॅमर - कम्प्युटर सायन्सची पदवी, एसएपी ग्लोबल प्रमाणपत्र आवश्यक
फील्ड ऑफिसर (जनरल) - विधी पदवी आवश्यक
फील्ड ऑफिसर (सोशल सर्व्हिस) - सोशल वर्कमध्ये एमएची पदवी आवश्यक
लिपिक टंकलेखक - 10 वी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग 40 शब्द/मिनीट आणि मराठी टायपिंग 30 शब्द/मिनीट, एमएससीआयटी आवश्यक
कम्प्युटर ऑपरेटर - कोणत्याही शाखेतील पदवी, कम्प्युटर अॅप्लिकेशन डिप्लोमा पदवी
लेखा लिपिक - वाणिज्य शाखेतून 12 वी उत्तीर्ण



हेही वाचा

ओह नो... महापालिकेतील कामगारांची भरती लांबली


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा