अवघ्या वीस मिनिटांत 125 कोटींच्या कामांना मंजुरी

 Pali Hill
अवघ्या वीस मिनिटांत 125 कोटींच्या कामांना मंजुरी

मुंबई - मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समितीत गुरूवारी अवघ्या वीस मिनिटांत सुमारे 125 कोटींच्या कामांचे प्रस्ताव मंजुर करून घेण्यात आले. पालिका निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी पक्षांसह विरोधकांनाही आपापल्या प्रभागातील विकासकामे मार्गी लावण्याची घाई झाली आहे. त्यामुळे स्थायी समितीत कोट्यवधींचे प्रस्ताव मांडले जात असताना, हे प्रस्ताव मंजुर करून घेतले जात असताना सर्वच नगरसेवक शांत होते. एरव्ही छोट्या-छोट्या विषयांवर स्थायी समितीत खंडाजंगी करणारे विरोधी पक्षातील नगरसेवकही चुप्पी साधून होते.

मंजुर झालेल्या प्रस्तावांपैकी काही प्रस्ताव असे

-सफाई कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरूस्ती-4 कोटी 70लाख 6 हजार 118 रु.

-घरघंटी खरेदी-2 कोटी 90 लाख 71 हजार 890 रु.

-गोरेगाव पूर्व शाळा पुर्नबांधणी-24 कोटी 73 लाख 85 हजार 755 रु.

-दहिसर नदीवरील पुलाचे विस्तारीकरण-7 कोटी 47 लाख 67 हजार 609 रु.

-हायवेवर 40 कँमेरे बसवणे-2 कोटी 45 लाख 71 हजार 678 रु.

-पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश-1 कोटी 99 लाख 16 हजार 523 रु.

-पालिका शाळांतील बांधकाम- 16 कोटी 51 हजार 341 रू.

Loading Comments