Advertisement

कोळी बांधवांच्या परवानगीशिवाय ग्रीन पार्क नाही- आयुक्त


कोळी बांधवांच्या परवानगीशिवाय ग्रीन पार्क नाही- आयुक्त
SHARES

मुंबईतील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी कफ परेड येथे भराव घातलेल्या ३०० एकर जमिनीवर ग्रीन पार्क बनवण्यासाठी विशेष प्रकल्प राबवणार असल्याची घोषणा महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केली.

या प्रकल्पाला कोळी बांधवांचा तीव्र विरोध असूनही आयुक्तांनी हा प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु कोळी बांधवांच्या परवानगीशिवाय हा प्रकल्प पुढे नेण्यात येणार नाही, अशी ग्वाही मेहता यांनी दिली. या भागाचा सर्व्हे करून त्यानंतरच हा प्रकल्प राबवला जाणार आहे. शिवाय यातून त्यांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून हा प्रकल्प साकारला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.


नद्यांचं सुशोभीकरण

महापालिकेतर्फे तलाव आणि नद्यांचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये दहिसर कांदळपाडा तलाव आणि बंदर पाखाडी तलाव, सायन तलाव तसंच
पोयसर, दहिसर नदीचे सुशोभीकरण होणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा