Advertisement

रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावावर विचार करू - आयुक्त


रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावावर विचार करू - आयुक्त
SHARES

राज्य सरकारने पंडिता रमाबाई मार्ग, जावजी दादाजी मार्ग, साने गुरुजी मार्ग व केशवराव खाडे मार्ग या मार्गावरून जाणाऱ्या सेंट्रल आयलॅंड एक्स्प्रेस वे करता रस्ता रुंदणीकरणाचा प्रस्ताव तयार केला आहे. या एक्स्प्रेस वे मुळे जवळपास 100 हून अधिक इमारती बाधित होणार असून, जवळपास 3 हजार कुटुंब बेघर होणार आहेत. हे बाधित कुटुंब मंगळवारी महापालिका मुख्यालयाबाहेर जमले. आणि त्यांनी आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली आणि निवेदन दिले. यावेळी मेहता यांनी 'रस्ता रुंदणीकरणासाठी पुन्हा सर्व्हे करू आणि तुम्हाला बेघर होऊ देणार नाही, तसेच तुमच्या पुनर्वसनाचा तेथेच विचार करू' असे आश्वासन दिल्याची माहिती ताडदेव गावदेवी रस्ता रुंदीकरण बाधित संघाचे सचिन शेलार यांनी दिली.

'1985 पासून रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न प्रलंबित असून, येथील इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. वर्षानुवर्षे राहत असलेल्या या भागातील इमारतीतील रहिवाशांना रस्ता रुंदीकरणामुळे बेघर होण्याची वेळ आली. पुन्हा आम्ही सर्वे करू जेणेकरून लोकांवर त्याचा परिणाम होणार नाही. 27 ते 36 फुटांचा एक्स्प्रेस वे बांधण्यात येणार आहे. 27 ते 36 फूट रस्ता बांधल्यास आमचं पुनर्वसन ताडदेवमध्ये करण्याची जबाबदारी सरकार आणि महापालिकेची असेल. जर आमचं पुनर्वसन मूळ जागेवर करायचं नसेल तर रस्ता 18 ते 23 फूट करावा, जेणेकरून एकही इमारत रस्ता रुंदीकरणात बाधित होणार नाही' अशी आमची मागणी असल्याचे शेलार यांनी सांगितले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा