Advertisement

अखेर अग्रवाल रुग्णालयाची इमारत धोकादायक घोषित !


अखेर अग्रवाल रुग्णालयाची इमारत धोकादायक घोषित !
SHARES

मुलुंड पश्चिमेकडील अग्रवाल रुग्णालयाची इमारत धोकादायक इमारत म्हणून अखेर महापालिकेने घोषित केली आहे. यासंदर्भात मुलुंड टी वॉर्डकडून रुग्णालयाला नोटीस देखील बजावण्यात आली आहे. तिथे नवीन इमारत तयार होईपर्यंत टी वॉर्ड कार्यालयामागील इमारत या रुग्णालयासाठी देण्यात येईल.


संपूर्ण रुग्णालय कसं सामावणार?

महापालिकेचं अग्रवाल रुग्णालय हे घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयाच्या अखत्यारीत येतं. अग्रवाल रुग्णालय जिथे ते स्थलांतर होणार आहे, ती इमारत फारच लहान आहे. त्यामुळे संपूर्ण रुग्णालय या इमारतीत कसं सामावणार हा मोठा प्रश्न आहे? त्याशिवाय रुग्णालयातील उपचारासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा इथे कशा पद्धतीने राबवणार? हा देखील तितकाच गहन प्रश्न रुग्णालय प्रशासनासमोर उपस्थित झाला आहे. तेव्हा या रुग्णालयाचे स्थलांतर कशा पद्धतीने केले जातं हे महत्वाचं ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या रुग्णालयावर मोर्चा नेण्यात आला होता. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.


अग्रवाल रुग्णालयाची इमारत धोकादायक असून नव्या इमारतीचं बांधकाम होईपर्यंत पालिकेची दुसरी इमारत त्यांना देण्यात येईल. नवी इमारत कशी असेल याची आखणी होणं बाकी आहे. तरी लवकरात लवकर ही इमारत उभी करण्याचा प्रयत्न केला जाईल.
- किशोर गांधी, अतिरिक्त आयुक्त, मुलुंड, टी. वॉर्ड


IMG-20171106-WA0042.jpg


स्थलांतर करण्यासाठी मिळणारी इमारत ही अद्याप रुग्णालयाच्या ताब्यात आलेली नाही. तेव्हा तिथे कशाप्रकारे स्थलांतर केले जाईल, हे १ ते २ दिवसांत ठरवण्यात येईल.
- डॉ. विद्या ठाकूर, प्रमुख, राजावाडी रुग्णालय

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा