वडाळा - वडाळ्यातल्या बरकतली डोंगरावर बेकायदेशीर असलेल्या घरांवर पालिकेनं हातोडा मारला. दोन महिन्यांपूर्वी या झोपडीधारकांना नोटीस देण्यात आली होती. तरीही झोपडीधारकांनी जागा खाली केली नाही. अखेर पालिकेनं अतिक्रमणाला सुरुवात केलीय. 20 ऑक्टोबरपर्यंत पालिका या झोपड्यांवर कारवाई करणाराय.
पालिकेच्या नोटीसनुसार फक्त थोडासा भाग तोडला जाणार होता. पण पालिकेनं पूर्ण कपड्याचं दुकान तोडल्याचं दुकान मालक असम शाह यांनी सांगितलं.