मुंबई महापालिकेचा २०२१- २०२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प बुधवारी महापालिकेत सादर करण्यात आला आहे. शिक्षण विभागासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २९४५.७८ कोटींची तरतूद केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात यंदा १.१९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षा संध्या दोशी यांच्याकडे शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प महानगरपालिका सभागृहात सादर केला.
मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये पुढील वर्षभरात १० नवीन सीबीएसई शाळा सुरू करण्यासोबतच २४ शाळांमध्ये दहावीपर्यंत शिक्षण सुरू करण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा करण्यात आली. यामुळे मुंबईतील विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी राज्य शिक्षण मंडळासोबतच सीबीएसई बोर्डाचाही पर्याय उपलब्ध होणार आहे.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना ऑनलाईन शिक्षणावर अधिक भर देण्यात आला होता. त्यामुळं या वर्षीच्या अर्थसंकल्पात याबाबत गांभीर्यानं विचार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅप आणि चॅट बोटच्या माध्यमातून करिअर काऊन्सिलिंगसाठी २१.१० लाख रुपयांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शाळांसाठी सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, थर्मल सकॅर यासाठी १५.९० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्यं