Advertisement

खासगी वाहन उचलणार सुका कचरा


खासगी वाहन उचलणार सुका कचरा
SHARES

मुंबईत ओला आणि सुका कचऱ्याच्या वर्गीकरणाची सक्ती केल्यानंतर ओल्या कचऱ्यासोबतच सुका कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. सुका कचरा वाहून नेण्यासाठी ४६ वाहनांची व्यवस्था केल्यानंतर आता सर्वच विभाग कार्यालयाच्या हद्दीत खासगी वाहनांची सेवा घेण्यात येणार आहे. मुंबईतील सातही परिमंडळामध्ये सुका कचरा वाहून नेण्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे.


म्हणून, महापालिकेवर टीका

मुंबई महापालिकेने ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाची सक्ती केल्यानंतर प्रत्यक्षात सुका कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात महापालिकेची यंत्रणा अपुरी पडत होती. महापालिकेने ४६ टेम्पो गृहनिर्माण संकुलातील सुका कचरा गोळा करण्यासाठी उपलब्ध करून दिले होते. पण सुका कचरा उचलण्यासाठी ही यंत्रणा सक्षम नसल्यामुळे महापालिकेला वारंवार लोकप्रतिनिधींच्या टिकेचे लक्ष्य व्हावे लागत आहे. त्यामुळे अखेर गृहनिर्माण आणि व्यावसायिक संकुलात निर्माण होणारा सुका कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक परिमंडळांमध्ये खासगी कंत्राटदारांकडून टेम्पो उपलब्ध करून दिले जात आहे.



सुका कचरा पालिका उचलणार

मुंबईतील सात परिमंडळांमध्ये सुमारे ५ कोटींचे कंत्राट देऊन खासगी टेम्पोची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. अनेक गृहनिर्माण तसेच व्यवसायिक संकुलांमध्ये सुका कचरा गोळा करून ठेवला जातो. तो सुका कचरा आता उचलला जाणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दोन वर्षांपूर्वी ९ हजार ५०० मेट्रीक टन असलेला कचरा सुमारे ७ हजार ३०० टन एवढा खाली आणल्याचा दावा महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केला आहे. ओला आणि सुका कचरा वर्गीकरण तसेच ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावून त्याद्वारे खतनिर्मिती प्रकल्प आदींद्वारे हे कचऱ्याच्या विल्हेवाटीचे प्रमाण कमी झाल्याचे घनकचरा विभागाच्या माध्यमातून सांगण्यात येते.


परिमंडळ १

  • कंत्राटदार : भवानी ट्रेडर्स
  • कंत्राट रक्कम : ७१.४७ लाख
  • टेम्पो फेऱ्या : ३१८०


परिमंडळ २

  • कंत्राटदार : भवानी ट्रेडर्स
  • कंत्राट रक्कम : ५६.३७ लाख
  • टेम्पो फेऱ्या : ३३६०


परिमंडळ ३

  • कंत्राटदार : लक्ष्य इंटरप्रायझेस
  • कंत्राट रक्कम : ७९: ७१ लाख
  • टेम्पो फेऱ्या : ३३३२


परिमंडळ ४

  • कंत्राटदार : सनरेझ इंटरप्रायझेस
  • कंत्राट रक्कम : ८७.८२ लाख
  • टेम्पो फेऱ्या :३४५६


परिमंडळ ६

  • कंत्राटदार : भवानी ट्रेडर्स
  • कंत्राट रक्कम : ९१.२८ लाख
  • टेम्पो फेऱ्या : ३३१२


परिमंडळ ७

  • कंत्राटदार : स्पॉट अँड साईट कलेक्शन
  • कंत्राट रक्कम : ७६.१४ लाख
  • टेम्पो फेऱ्या :३२३७



हेही वाचा - 

हमी द्या, तरच कचरा उचलणार!' - आयुक्त अजोय मेहता निर्णयावर ठाम


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा