बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शहरातील 100 प्रमुख मालमत्ता कर (tax) थकबाकीदारांना (defaulters) नोटीस बजावली आहे. ज्यात टॉप 10 थकबाकीदारांकडे एकूण 600 कोटी रुपये थकीत आहेत.
रघुवंशी मिल्स लिमिटेडचे 119.59 कोटी रुपये, त्यानंतर मेसर्स ओंकार डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे 104.78 कोटी रुपये थकीत आहेत. महापालिकेच्या G दक्षिण वॉर्डमधील टॉप 10 डिफॉल्टर्सपैकी सहा प्रभादेवीतील आहेत.
महापालिकेच्या कर मूल्यांकन आणि संकलन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, थकबाकीदारांनी “डिमांड लेटर” ला प्रतिसाद न दिल्याने कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. महापालिकेने थकबाकीदारांना मालमत्तेची अटॅचमेंट नोटीस पाठवली आहे.
ज्याचे पालन न केल्यास जप्तीच्या नोटीस आणि नंतर लिलावाच्या नोटीस पाठवल्या जातील. थकबाकीदारांनी थकबाकी भरली नाही तर मालमत्ता जप्त केली जाईल.
"100 डिफॉल्टर्स आहेत आणि आम्ही टॉप 10 ची यादी जाहीर केली आहे. वेगवेगळ्या डिफॉल्टर्सना वेगवेगळ्या दिवशी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या," असे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
महापालिकेची कारवाई बृहन्मुंबई (mumbai) महानगरपालिका कायद्याच्या कलम 203, 204, 205 आणि 206 नुसार आहे, जे महापालिकेला थकबाकी वसूल करण्यासाठी मालमत्ता जप्त करण्याची आणि नंतर लिलाव करण्याची परवानगी देते.
महापालिकेच्या (bmc) महसुलाचा मुख्य स्त्रोत असलेला मालमत्ता कर नोटीस मिळाल्यापासून 90 दिवसांच्या आत महापालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. या कालावधीत कर भरला नाही, तर महापालिका टप्प्याटप्प्याने कारवाई सुरू करते.
प्रथम, महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागाचे अधिकारी थेट संपर्क आणि संप्रेषणाद्वारे पैसे भरण्यासाठी डिफॉल्टर्सना कर भरण्याबाबत पाठपुरावा करतात. मालमत्ता कर भरला नाही तर, "मागणी पत्र" पाठवले जाते.
पुढील पायरी म्हणजे मालमत्ताधारकाला 21 दिवसांची अंतिम सूचना दिली जाते. शेवटी, तरीही प्रतिसाद न मिळाल्यास, थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जाते.
महापालिका विविध माध्यमांद्वारे मालमत्ता कर वसुलीसाठी जनजागृती आणि आवाहन करते. मालमत्ताधारक ऑनलाइनही कर भरू शकतात.
हेही वाचा