Advertisement

कॉग्रेसचा महापालिकेच्या पेंग्विन देखभाल निविदेला विरोध

भायखळा येथील वीर जिजाबाई भोसले उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील पेंग्विनच्या देखभालीसाठी महापालिकेनं काढल्या आहेत. मात्र या निविदेला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

कॉग्रेसचा महापालिकेच्या पेंग्विन देखभाल निविदेला विरोध
SHARES

भायखळा येथील वीर जिजाबाई भोसले उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील पेंग्विनच्या देखभालीसाठी महापालिकेनं काढल्या आहेत. मात्र या निविदेला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. शिवाय, मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील वीर माता जिजाबाई भोसले उद्यानातील पेंग्विन म्हणजे कंत्राटदारांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. पेंग्विनच्या देखभाल खर्चावरून महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी टीका केली आहे.

महापालिकेनं पुढील ३ वर्षांतील पेंग्विनच्या देखभालीसाठी १५ कोटी रुपयांची निविदा काढली आहे. गेली ३ वर्षे देखभालीपोटी कंत्राटदाराला ११ कोटी दिले. देखभालीसाठी मुंबई महापालिकेचे डॉक्टर नेमणे शक्य असतानाही निविदा काढून कंत्राटदार नेमण्याची गरज काय, असा प्रश्न रवी राजा यांनी केला आहे.

१५ कोटींच्या सुधारित निविदेनुसार दरवर्षी ५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यात पेंग्विन प्रदर्शनाची देखभाल व वातानुकूलन सुविधा, लाइफ सपोर्ट, इलेक्ट्रिकल सिस्टम, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा आणि पेंग्विनसाठी मासे, अन्न पुरवण्यासाठी खर्च आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे पेंग्विन खरेदीसाठी आणि कक्षासाठी एकूण २५ कोटींचा खर्च झाला होता. त्यानंतर ३ वर्षांच्या देखभालीसाठी ११ कोटी खर्च झाले. त्यानंतर आता पुन्हा पुढच्या ३ वर्षांसाठी १५ कोटी खर्च अपेक्षित आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा