Advertisement

बोरिवलीत अनधिकृत मदरशावर पालिकेची कारवाई


बोरिवलीत अनधिकृत मदरशावर पालिकेची कारवाई
SHARES

पालिकेच्या आर उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोरिवली (प.) येथील अनधिकृत मदरशावर तोडक कारवाई केली आहे. भाजपाचे नगरसेवक हरिश छेडा यांनी पालिकेकडे तक्रार केल्यामुळेच ही कारवाई झाली, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. मात्र आपण अशी कोणतीच तक्रार केली नसल्याचे म्हणत नगरसेवक हरिश छेडा यांनी आरोपांचे खंडण केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बोरिवली (प.), शिवाजीनगरमध्ये 'मदरसा ए अरबिया इस्लामिया' नावाचा मदरसा असून तो खूप जुना आहे. मदरशाचे सचिव मूसा इब्राहिम पटेल यांनी सांगितले की, या मदरशावरील पत्रे जीर्ण झाले होते. त्यामुळे ते बदलले होते. पण त्याची दुरुस्ती करण्यात आली नव्हती. फक्त याच कारणामुळे पालिकेच्या आर उत्तर विभागाने 3 मार्चला तोडक कारवाईची नोटीस पाठवली होती. त्यानंतर वकिलांच्याद्वारे त्याचा जबाबही पालिकेकडे नोंदवला गेला. पण यानंतरही 4 मे रोजी संध्याकाळी पालिकेच्या आर उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात ही तोडक कारवाई केली. तेथील स्थानिकांचे म्हणणे आहे, नगरसेवक हरीश छेडा यांनी तक्रार केल्यामुळेच ही तोडक कारवाई झाली. पण छेडा यांनी आपण अशी कोणतीच तक्रार केली नाही असे म्हटले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा