
महापालिकेच्या म्हणण्यानुसार, या सुविधेमुळे तक्रारींची नोंद जलद होईल आणि संबंधित विभागाकडून तत्काळ कारवाई करणे शक्य होईल.
मॅनहोलबाबत तक्रार नोंदवण्यासाठी पुढील प्रक्रिया करावी:
9324500600 या क्रमांकावर WhatsApp वर मेसेज पाठवा.
'Submit Complaint' हा पर्याय निवडा.
मॅनहोलचे अचूक लोकेशन शेअर करा.
उघड्या किंवा तुटलेल्या मॅनहोलचा फोटो अपलोड करा.
तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला युनिक तक्रार क्रमांक (Complaint Registration Number) मिळेल, ज्याद्वारे तक्रारीचा पाठपुरावा करता येईल.
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, MyBMC Marg मोबाईल अॅपद्वारेही नागरिक तक्रार नोंदवू शकतात.
त्यासाठी:
मोबाईल क्रमांक आणि OTP ने लॉगिन करा.
'New Registration' निवडा.
संबंधित तक्रारीचा प्रकार निवडा.
आवश्यक असल्यास थोडक्यात माहिती लिहा.
फोटो किंवा Geo-tagged फोटो अपलोड करा.
तक्रार नोंदवल्यानंतर नोंदणी क्रमांक मिळेल.
महापालिकेने नागरिकांसाठी इतर पर्यायही उपलब्ध ठेवले आहेत.
WhatsApp Chatbot: 8999228999
MyBMC Marg मोबाईल अॅप
BMC ची अधिकृत वेबसाइट
1916 नागरिक हेल्पलाइन
सामान्य WhatsApp चॅटबॉटवर:
"Khadda" किंवा मराठीत "खा " पाठवून खड्ड्यांची तक्रार,
"Manhole" किंवा "मा" पाठवून मॅनहोलची तक्रार करता येईल. त्यासोबत लोकेशन आणि फोटो पाठवणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात उघडे किंवा तुटलेले मॅनहोल पादचारी आणि वाहनचालकांसाठी मोठा धोका ठरू शकतात. त्यामुळे अशा प्रकारचे मॅनहोल दिसताच तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
महापालिकेच्या मते, या नव्या WhatsApp चॅटबॉटमुळे तक्रारींची नोंद, त्यावर देखरेख आणि प्रत्यक्ष कारवाई अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा
