Advertisement

मुंबईवर पुन्हा एकदा पाणी कपातीची टांगती तलवार?

मुंबईकरांसमोर पुन्हा एकदा पाणी कपातीचं संकट उभं राहिलं आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांमध्ये घट झाल्यामुळं मुंबकरांना पाणी कपातीला सामोर जावं लागण्याची शक्यता आहे.

मुंबईवर पुन्हा एकदा पाणी कपातीची टांगती तलवार?
SHARES

मुंबईकरांसमोर पुन्हा एकदा पाणी कपातीचं संकट उभं राहिलं आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांमध्ये घट झाल्यामुळं मुंबकरांना पाणी कपातीला सामोर जावं लागण्याची शक्यता आहे. मे महिन्यापासून मुंबई महापालिका आणखी ५ टक्के पाणी कपात  करण्याचा विचारात आहे. या महिन्याच्या अखेरीस आयोजित बैठकीत याबाबात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.


मुबलक पाणी उपलब्ध

मुंबईकरांना जून महिन्यापर्यंत पाणी पुरवठा करण्यासाठी मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध असल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली. परंतु जुलै महिन्यात पाऊस मुबलक प्रमाणात न झाल्यास पाणीसाठा शिल्लक ठेवणं आवश्यक असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं.

तसंच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अपर वैतरणा, मोडक सागर, मध्य वैतरणा, भातसा, तानसा, विहार आणि तुलसी या धरणांमध्ये सध्या केवळ २२ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत या धरणांमध्ये ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.




हेही वाचा -

बेनामी ६ कोटी रुपयांना अद्याप वाली नाही

१ जूनला सुरू होणार एसटीचं जेनेरिक औषधालय



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा