Advertisement

Corona virus: ५०% कर्मचाऱ्यांच्या आधारावर काम करा - पालिका

खाजगी कंपन्यांनी केवळ ५०% स्टाफच्या आधारावर काम चालवावे, असे आदेश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिले

Corona virus: ५०% कर्मचाऱ्यांच्या आधारावर काम करा - पालिका
SHARES

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने बाधित रुग्णांची संख्या ३९ वर पोहचली असताना. (Coronavirus) दिवसेंदिवस कोरोनाटा फैलाव राज्यात झपाट्याने होत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र सातत्याने समोर येणारे कोरोना व्हायरसचे नवे रुग्ण चिंतेत भर घालत आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खाजगी कंपन्यांनी केवळ ५०% स्टाफच्या आधारावर काम चालवावे, असे आदेश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिले आहेत. तसंच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता १८८ या कलमाअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.

यापूर्वीही मुंबई महानगरपालिकेने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कोरोना व्हायरस संबंधित नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर केवळ कोरोना व्हायरसबद्दल जागरुकता निर्माण करणारे होर्डिंग्स लावण्यात यावे, असे आदेश बीएमसीने दिले होते. त्याच बरोबर शाळा, महाविद्यालय, चित्रपटगृह, नाट्यगृह तरणतलाव, जीम खासगी आणि राजकिय कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. 

हेही वाचाः- एक अर्ज अवैध झाल्याने राज्यसभा निवडणूक बिनविरोध

हजारो लोकांचा जीव घेणाऱ्या कोरोना विषाणुचे रुग्ण मुंबईत आणि महाराष्ट्रात आढळून आले आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ही संख्या आणखी वाढू नये म्हणून विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी कोरोनाचे रुग्ण असलेल्या रुग्णालयांच्या जवळची वाहतूक बंद करण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिले आहेत.त्यासाठी पालिका आयुक्तांनी परिपत्रक काढले आहे. त्यात खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी, शाळा, स्विमिंग पूल, जिम, चित्रपटगृह बंद ठेवावीत असे निर्देशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत. 

हेही वाचाः-  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आदित्य ठाकरेंची संस्थांना तंबी

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा