Advertisement

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आदित्य ठाकरेंची संस्थांना तंबी

सरकारने जारी केलेल्या सूचनांचे नागरिक आणि संस्थांनी पालन केले पाहिजे

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आदित्य ठाकरेंची संस्थांना तंबी
SHARES

सध्या देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेला असून महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. राज्य सरकारने कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी अनेक निबर्ंध घातले असून तसे आदेश जारी केले आहेत. पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सरकारने जारी केलेल्या सूचनांचे नागरिक आणि संस्थांनी पालन केले पाहिजे असं म्हटले आहेत. तसंच कोणत्याही संस्थेने या परिस्थितीला कमी लेखू नये अशी तंबीही दिली आहे.

हेही वाचाः- मुंबईच्या तापमानात आणखी वाढ होणार

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या सूचनांचे पालन सर्व नागरिक आणि संस्थांनी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने मध्यस्थी करावी अशी परिस्थिती आहे. कोणत्याही संस्थेने या परिस्थितीला कमी लेखू नये.आदित्य ठाकरे यांनी यावेळी कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभुमीवर महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती दिली. आम्ही सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. तसंच सुरक्षेच्या दृष्टीने सर्व काळजी घेत असल्याचेही सांगितले आहे.

हेही वाचाः- Coronavirus Updates: तिकीट देण्यापूर्वी पश्चिम रेल्वेकडून परदेशी नागरिकांची तपासणी

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत सहली किंवा व्यावसायिक दौर्‍यांवर निबर्ंध घातले आहेत. खासगी सहल कंपन्या (टूर ऑपरेटर) किंवा व्यक्तींना असे दौरे ३१ मार्चच्या रात्री १२ वाजेपर्यंत आयोजित करता येणार नाहीत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहितेतील कलम १८८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. मॉल्स, सिनेमागृहे, नाटयगृहे, शाळा-महाविद्यालये याबरोबरच संग्रहालयेही बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले असून मुंबईत पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन सरकारने केले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा