मुंबईच्या रस्त्यांवर लागणार ‘वाॅटर एटीएम’

मुंबईकरांना लवकरच शहरातील रस्त्यांवर १ रुपये प्रति लिटर दराने पाणी खरेदी करता येणार आहे. मुंबई महापालिके (BMC)ने शहरांत ठिकठिकाणी वाॅटर एटीएम(Water ATM) लावण्याचं ठरवलं आहे.

SHARE

मुंबईकरांना लवकरच शहरातील रस्त्यांवर १ रुपये प्रति लिटर दराने पाणी खरेदी करता येणार आहे. मुंबई महापालिके (BMC)ने शहरांत ठिकठिकाणी वाॅटर एटीएम(Water ATM) लावण्याचं ठरवलं आहे.

इथं लागणार ‘वाॅटर एटीएम’

महापालिकेने आपल्या अर्थसंकल्पा ‘एनी टाइम वाॅटर’ योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार महापालिकेच्या जल विभागाने खासगी ठेकेदारांच्या मदतीने या ‘वाॅटर एटीएम’च्या योजनेवर काम सुरू केलं आहे. या योजनेनुसार शहरातील चौपाट्या, उद्यान आणि काही पदपथांवर ‘वाॅटर एटीएम’ लावले जातील.

काय आहे ‘वाॅटर एटीएम’

‘वाॅटर एटीएम’ची सुरूवात रेल्वे प्रशासनाने सर्वात आधी केली होती. या योजनेद्वारे अत्यंत कमी दरांत स्वच्छ पाणी विकत घेता येतं. ‘वाॅटर एटीएम’मधून फिल्टर्ड पाणी मिळतं. यासाठी लावण्यात येणाऱ्या यंत्रांना जलवाहिनीची जोडणी करण्यात येते. ज्याद्वारे सर्वसामान्यांना १ रुपया मशिनमध्ये टाकून एक लिटर पाणी विकत घेता येतं. ही सुविधा २४x७ उपलब्ध असते.

प्रायोगिक तत्वावर सेवा

महापालिकेने प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरू करण्याचं ठरवलं आहे. ज्या मरीन ड्राइव्ह आणि गिरगाव चौपाटी इथं प्रायोगिक तत्वावर हे मशिन्स लावण्यात येणार आहेत. यासाठी डिसेंबरपर्यंत खासगी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात येईल. हेही वाचा-

'सीएसएमटी'ला 'सर्वोत्कृष्ट स्वच्छ प्रेक्षणीय स्थळ' पुरस्कार

वाहन कायद्यातील दुरूस्ती अद्याप लागू नाही, २ दिवसांत अधिसूचना लागू होण्याची शक्यतासंबंधित विषय
ताज्या बातम्या