Advertisement

BMC Elections 2022: मार्च महिन्यात मुंबई महापालिका निवडणुकीची शक्यता

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर काय काळजी घ्यावी, यासंदर्भात निवडणूक आयोगानं काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

BMC Elections 2022: मार्च महिन्यात मुंबई महापालिका निवडणुकीची शक्यता
SHARES

मुंबई मबापालिकेची निवडणूक (BMC Elections 2022) येत्या मार्च महिन्यात होण्यची शक्यता आहे. फक्त मुंबई महापालिकेचीच नाही तर राज्यातील इतर १४ महानगरपालिकांच्या निवडणुका मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे.

तसंच 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुका (Jilha Parishad Election) मार्च महिन्यात घेण्याचा निवडणूक आयोगाचा मानस असल्याच्या चर्चा आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर काय काळजी घ्यावी, यासंदर्भात निवडणूक आयोगानं काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनामुळे आता कोणत्याही निवडणुका थांबणार नाहीत, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच मतदान केंद्रावर काय काळजी घ्यावी याबाबत सूचना जारी केल्या आहेत.

निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्यासंदर्भात काय उपाययोजना करणे आवश्यक आहे? अगदी एखादा मतदार विनामास्क आला तरी ती परिस्थिती कशी हाताळावी यासंदर्भात माहिती यात देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच निवडणुकांचे बिगूल वाजण्याची शक्यता आहे.

प्रभागरचनेतील लोकसंख्येबाबतही यात स्पष्टता देण्यात आली आहे. एका प्रभागात हजार ते दीड हजार लोकसंख्या असावी अशा सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. मुंबईतील प्रभागरचनेचा आराखडा आधीच निवडणूक आयोगापुढे ठेवल्यानं ही प्रक्रिया वेगवान होण्याची शक्यता आहे.

मुंबईतली प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ वर गेली आहे. यावेळी काही राजकीय वादही दिसून आला. मुंबईतील नव्या वस्त्या, नव्या इमारती, वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन ही प्रभागरचना करण्यात आली आहे. मुंबई काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरात प्रत्येकी तीन वॉर्ड वाढवले जाण्याची शक्यता आहे. शुक्रवार, २१ जानेवारीपर्यंत सुधारित प्रभाग सीमांकन सादर केले जाईल.

आता, SEC अहवालाची छाननी करेल आणि सूचना आणि हरकती आमंत्रित करून सार्वजनिक डोमेनमध्ये ठेवेल. यानंतर, प्रशासकीय वॉड्सच्या आरक्षणाचा दर्जा ठरवण्यासाठी पालिका लॉटरी काढेल.

एकूण २२७ जागांपैकी शिवसेनेला ९७ जागा, तर भारतीय जनता पक्षाला ८३, काँग्रेस २९, राष्ट्रवादी काँग्रेस (एनसीपी) ८, समाजवादी पार्टी (एसपी) सहा जागा, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादकडे आहेत. -उल-मुस्लिमीनला दोन तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक जागा आहे.हेही वाचा

पालिकेच्या वॉर्ड संख्या वाढवण्याच्या निर्णयाविरोधातील याचिका फेटाळली

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा