Advertisement

पालिकेच्या वॉर्ड संख्या वाढवण्याच्या निर्णयाविरोधातील याचिका फेटाळली

राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात भाजपा नगरसेवक अभिजित सामंत आणि नगरसेविका राजश्री शिरवाडकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

पालिकेच्या वॉर्ड संख्या वाढवण्याच्या निर्णयाविरोधातील याचिका फेटाळली
SHARES

मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकाला मोठा दिलासा मिळाला आहे. पालिकेतील वॉर्ड संख्या वाढवण्याच्या निर्णयाविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे.

सध्या मुंबईची नगरसेवक संख्या २२७ आहे. पण मुंबई शहराची वाढती लोकसंख्या पाहता मुंबई महापालिकेतील प्रभाग रचना २३६ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. पण राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात भाजप नगरसेवकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात भाजपा नगरसेवक अभिजित सामंत आणि नगरसेविका राजश्री शिरवाडकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

यापूर्वी साल २०११ च्या जनगणणेनुसार वॉर्ड संख्या वाढवण्यात आली आहे. नोव्हेंबर २०११ मध्येच वॉर्ड संख्या २२१ वरून २२७ करण्यात आली आहे. त्यावेळी मुंबईतील लोकसंख्येत ४ लाखांची वाढ नोंदवण्यात आली. त्यानंतर साल २०१७ च्या निवडणुकीत जनगणना आणि अनुसूचित जातींच्या प्रभागातील लोकसंख्येनुसार वॉर्डांची पुनर्रचनाही करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी जनगणना झालेली नसताना पुन्हा त्याच धर्तीवर संख्या वाढवता येत नाही असा याचिकाकर्त्यांनी दावा केला. तसंच मुंबईची लोकसंख्या कोरोनाकाळात कमीही झालेली असू शकते. ती वाढलेलीच आहे, असा अंदाज बांधणं आणि त्यानुसार वॉर्ड संख्या वाढवणं योग्य ठरणार नाही असाही याचिकाकर्त्यांनी दावा केला.हेही वाचा

सेल्फ टेस्ट किटची माहिती पालिकेला देणं बंधनकारक

... म्हणून मुंबई विद्यापीठातील ५००० झाडांना बसवला क्यूआर कोड

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा