Advertisement

महापालिकेच्या शाळांना लागली वाळवी

शिक्षण समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी हरकतीच्या मुदयाद्वारे कुर्ला येथील शाळेतील वर्गांमध्ये लागलेल्या वाळवीबाबत चिंता व्यक्त केली.

महापालिकेच्या शाळांना लागली वाळवी
SHARES

 मुंबई महापालिकेच्या कुर्ला येथील शाळांना वाळवी लागल्याची बाब शिक्षण समितीच्या बैठकीत सदस्यांनी निदर्शनास आणली. मात्र, ही समस्या एका शाळेपुरती मर्यादीत नसून बहुतांशी शाळांमध्ये भिंतींना आणि लाकडी बेंचना वाळवी लागल्याच्या तक्रारी सदस्यांनी केली. त्यामुळे शाळांमध्ये लागलेल्या वाळवीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी संस्थेची निवड करण्यात यावी, असे आदेश शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी प्रशासनाला दिले.


दुरुस्ती केलेल्या शाळांना वाळवी 

शिक्षण समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी हरकतीच्या मुदयाद्वारे कुर्ला येथील शाळेतील वर्गांमध्ये लागलेल्या वाळवीबाबत चिंता व्यक्त केली. मागील अनेक वर्षांपासून शाळेतील वाळवीबाबत आपण पाठपुरावा करत आलो आहोत. पण यापूर्वी पेस्ट कंट्रोल करण्यासाठी धोरण नव्हतं. परंतु माझ्या विभागातील किर्लोस्कर मार्ग महापालिका शाळेची दुरुस्ती केल्यानंतरही त्याठिकाणी भिंतीना वाळवी लागलेली आहे. मग दुरुस्ती केलेल्या शाळांना वाळवी लागते कशी असा सवाल त्यांनी केला.


लाकडी बेंचमुळेच वाळवी 

शिवसेनेच्या सचिन पडवळ यांनी याला पाठिंबा देत शिवडी साईबाबा पथ महापालिका शाळेतील वर्गातही वाळवी लागल्याचं सांगितलं. महापालिका शाळांमधील अनेक जुने लाकडी बेंच हे एका वर्गात जमा केले जातात. त्यामुळे लाकडी बेंचमुळेच वाळवी लागत असल्याचंही त्यांनी सांगितलं.  महापालिका शाळांमध्ये जिथे वाळवी लागली, तिथे त्वरीत पेस्ट कंट्रोल करण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली.


पेस्ट कंट्रोलचे अादेश 

यावर महापालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी याची नोंद घेऊन त्वरीत कार्यवाही केली जाईल, असं सांगितलं. परंतु यावर शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी बहुतांशी शाळांमध्ये वाळवी लागण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे यासाठी संस्थेची निवड करून जिथे असे प्रकार निदर्शनास येतील, तिथं त्यांच्याकडून पेस्ट कंट्रोल करण्यात यावं असे आदेश प्रशासनाला दिले.



हेही वाचा - 

बंदच्या काळात औषधांसाठी इथं करा संपर्क; गुरूवारी रात्रीपासून औषध विक्रेते संपावर

मुंबईत परतीच्या पावसाला सुरूवात; मुंबईकरांची तारांबळ




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा