Advertisement

बंदच्या काळात औषधांसाठी इथं करा संपर्क; गुरूवारी रात्रीपासून औषध विक्रेते संपावर

आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टकडून ई- फार्मसीविरोधात एकदिवसीय बंदची हाक दिली आहे. त्यानुसार गुरूवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ पर्यंत २४ तास औषध दुकानं बंद राहतील.

बंदच्या काळात औषधांसाठी इथं करा संपर्क; गुरूवारी रात्रीपासून औषध विक्रेते संपावर
SHARES

ई - फार्मसीविरोधात मुंबईसह देशभरातील औषध विक्रेत्यांनी एकदिवसीय बंदची हाक दिली आहे. त्यानुसार गुरूवारी रात्री १२ वाजता देशभरातील ७ लाखांहून अधिक औषध दुकानांचे शटर डाऊन होणार असून हे शटर थेट शुक्रवारी रात्री १२ वाजता उघडणार आहे.  त्यामुळं रूग्णांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. पण आता रूग्णांनो काळजी करण्याची गरज नाही. कारण जर कुठलंही औषध मिळत नसेल तर तुमच्या मदतीला अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) धावून आलं आहे.


एफडीएकडून उपाययोजना 

बंदच्या पार्श्वभूमीवर औषधांची कमतरता पडू नये, रूग्णांना-नातेवाईकांना आवश्यक ती औषधं सहज उपलब्ध व्हावीत यासाठी एफडीएनं आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. तर एफडीएकडून  टोल फ्री क्रमांकही जाहीर केले आहेत. तेव्हा या क्रमांकावर संपर्क साधा आणि औषध मिळवा.


साठा ठेवण्याच्या सूचना

आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टकडून ई- फार्मसीविरोधात एकदिवसीय बंदची हाक दिली आहे. त्यानुसार गुरूवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ पर्यंत २४ तास औषध दुकानं बंद राहतील. या पार्श्वभूमीवर एफडीएने ठोक आणि किरकोळ औषध विक्रेत्यांना व्यवहार सुरू ठेवण्याचं आवाहन केलं आहे. तर रूग्णालय आणि रूग्णालयातील औषध दुकानांमध्ये पुरेसा औषधांचा साठा ठेवण्याच्या सूचनाही एफडीएकडून रूग्णालय आणि डाॅक्टरांना करण्यात आल्या आहेत. रूग्णालयातील २४ तास सुरू राहणारी औषध दुकानांतील व्यवहार सुरळीत ठेवण्याचीही सुचना करण्यात आल्याचं एफडीएकडून सांगण्यात आलं आहे.


टोल फ्री क्रमांक

बंदच्या काळात एखाद्या  रूग्णाला-नातेवाईकांना आवश्यक ती औषध मिळत नसतील तर ही औषध कुठे आणि कशी मिळतील याची माहिती एफडीएकडून दिली जाणार आहे. त्यासाठी एफडीएनं १८००२२२३६५ (टोलफ्री) आणि ०२२-२६५९२३६६२, २६५९२३६३, २६५९२३६४ आणि २६५९२३६५ हे दूरध्वनी क्रमांक जाहीर केले आहेत. या क्रमांकावर संपर्क साधत औषध उपलब्ध करून घेता येतील. महत्त्वाचं म्हणजे सर्व विभागीय सहआयुक्त कार्यालय आणि जिल्हास्तरीय सहायक आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला आहे. 



हेही वाचा - 

ड्रॅगन, किवी फळात पौष्टिक घटक नाहीत?

न धुतलेल्या कपड्यांमुळे सायन रुग्णालयातील ४० शस्त्रक्रिया रद्द





Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा