न धुतलेल्या कपड्यांमुळे सायन रुग्णालयातील ४० शस्त्रक्रिया रद्द

मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात रुग्णांना लॉण्ड्रीतून कपडे धुवून न मिळाल्याने सोमवारी तब्बल ४० शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या आहेत. विशेष म्हणजे इतकी मोठी घटना घडल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाकडून सार्वजनिक सुट्ट्यांच्या नावाने लपवाछपवी केली जात असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

SHARE

राज्य सरकारने शस्त्रक्रियांदरम्यान लागणारे साहित्य पुरवणाऱ्या कंपन्यांचे ९० कोटी रुपये थकवल्याने कंत्राटदारांनी सरकारी रुग्णालयांना साहित्य न पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयात शस्त्रक्रिया रखडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात रुग्णांना लॉण्ड्रीतून कपडे धुवून न मिळाल्याने सोमवारी तब्बल ४० शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या आहेत. विशेष म्हणजे इतकी मोठी घटना घडल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाकडून सार्वजनिक सुट्ट्यांच्या नावाने लपवाछपवी केली जात असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.


या लाॅण्ड्रीतून कपडे येतात धुवून

सायन रुग्णालयातील रुग्णांच ५० टक्के कपडे प्रभादेवी येथील पालिकेच्या सेंट्रल लॉण्ड्रीमध्ये तर ५० टक्के कपडे खासगी लॉण्ड्रीत धुण्यासाठी पाठवल जातात. खासगी लॉण्ड्रीचं कंत्राट जून २०१७ मध्ये संपलं असूनही अद्याप नवीन निविदा काढण्यात आलेली नाही. त्यामुळे खासगी लॉण्ड्रीला देण्यात येणारे कपडे सेंट्रल लॉण्ड्रीत धुण्यासाठी पाठवले जातात.

रुग्णालयात दररोज सुमारे साडेतीन हजारांहून अधिक कपडे धुण्यासाठी लॉण्ड्रीमध्ये पाठवले जात असले, तरी सेंट्रल लॉण्ड्रीत फक्त ३८ कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. दररोज इतक्या मोठ्या प्रमाणात कपडे धुणे त्यांना शक्य होत नसल्याने कपडे मिळण्यास उशीर होत आहे.


कपडे धुणे का आवश्यक?

शस्त्रक्रियेदरम्यान संसर्ग होऊ नये यासाठी रुग्णांना स्वच्छ कपडे आवश्यक असतात. ते न मिळाल्याने युरोलॉजी, ऑर्थोपेडिक, न्युरॉलॉजी आणि जनरल शस्त्रक्रिया विभागातील ४० शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या आहेत. सध्या सेंट्रल लॉण्ड्रीत कर्मचाऱ्यांची ८३ पदे असूनही फक्त ३८ कर्मचाऱ्यांवर कामाचा गाडा हाकला जात आहे. ही रिक्त पदे भरल्यास दररोज १५००० कपडे धुतले जाऊ शकतात.


मशिन नादुरुस्त

लॉण्ड्रीमध्ये कपडे धुण्यासाठी १० मशिन असून त्यापैकी २ नादुरुस्त आहेत. त्यामुळे एकदा धुण्यासाठी दिलेले कपडे ८ ते १० दिवसांनी मिळत असल्याने शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अश्रफ आझमी यांनी केला आहे. याबाब त्यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांच्याकडे तक्रारही दाखल केली आहे.


महापालिकेच्या लॉण्ड्रीमध्ये गणपतीच्या सुट्या तसेच गणेशविसर्जनाच्या कारणामुळे कपडे वेळेवर उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे युरोलॉजी आणि शस्त्रक्रिया विभागातील सोमवारच्या जवळपास २२ शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. त्याशिवाय लॉण्ड्रीसाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली असून लवकरच हे कपडे महापालिकेच्या लॉण्ड्रीमध्येच धुण्यात येतील.
- डॉ. जयश्री मोंडकर, अधिष्ठाता लोकमान्य टिळक रुग्णालय, सायनहेही वाचा-

नायर रुग्णालयाविरोधात हायकोर्टात याचिका

डेंग्यू आणि लेप्टोमुळे दोघांचा मृत्यूसंबंधित विषय
ताज्या बातम्या