Advertisement

डेंग्यू आणि लेप्टोमुळे दोघांचा मृत्यू


डेंग्यू आणि लेप्टोमुळे दोघांचा मृत्यू
SHARES

मुंबई महापालिकेच्या अहवालानुसार १ ते १५ सप्टेंबर दरम्यान एका व्यक्तींचा डेंग्यूमुळे, तर दुसऱ्याचा लेप्टोस्पायरोसीसने मृत्यू झाला आहे.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेश इथून आलेल्या मालाडमधील ४६ वर्षांच्या महिलेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. या महिलेला ताप आणि अंगदुखीचा त्रास हाेत असल्याने तिला सुरूवातीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु तिथून तिला उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा न झाल्याने ती पुन्हा सरकारी रुग्णालयात दाखल झाली. परंतु दाखल झाल्यानंतर २ तासांतच तिचा मृत्यू झाला.

डेंग्यूची लक्षणे आढळून आलेल्या २,३२२ रुग्णांवर १ ते १५ सप्टेंबर या कालावधीत उपचार करण्यात आले. तर महापालिकेने संपूर्ण शहरात ३,२९५ जणांची डेंग्यू चाचणी केली.

महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर रोजी अंधेरीतील ३७ वर्षांच्या व्यक्तीचा लेप्टोने मृत्यू झाला. या रुग्णाला मृत्यूच्या तीन दिवस आधीपासून अंगदुखी आणि थंडीतापाचा त्रास जाणवत होता. त्यातच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अस्वच्छ पाण्यात गेल्यामुळे या व्यक्तीला लेप्टोची लागण झाली होती.



हेही वाचा-

३४३ औषधांवर केंद्राची बंदी; सिप्ला, वोखार्डसह बड्या कंपन्यांना झटका

देशभरातल्या औषध विक्रेत्यांचा २८ सप्टेंबरला बंद



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा